घरताज्या घडामोडीराज ठाकरेंच्या नव्या भूमिकेला ज्येष्ठ शिवसैनिकाचा आशीर्वाद; 'या' कॉल रेकॉर्डची चर्चा

राज ठाकरेंच्या नव्या भूमिकेला ज्येष्ठ शिवसैनिकाचा आशीर्वाद; ‘या’ कॉल रेकॉर्डची चर्चा

Subscribe

राज ठाकरेंच्या नव्या भूमिकेला ज्येष्ठ शिवसैनिकाचा आशीर्वाद.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज साजरी केली जात असतानाच मुंबईत मात्र, राजकीय धुरळा उडणार आहे. मुंबईत गुरुवारी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. तब्बल १४ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर मनसेने आपला झेंडा बदलण्याचा निर्णय घेतला असून या अधिवेशनात अनेक राजकीय ठराव केले जाणार आहेत. त्यामुळे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष मनसेच्या नव्या भूमिकेवर लागून राहिले आहे. तसेच अनेक ठिकाणी ‘विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा’, या आशयाचे पोस्टर्स देखील झळकलेले पाहायला मिळत आहेत.

- Advertisement -

दरम्यान, मनसेचा नवीन झेंडा समोर आला असून या झेंड्यामध्ये संपूर्ण भगवा रंग वापरण्यात आला आहे. तसेच या झेंड्याच्या मध्यभागी शिवमुद्रा तर दुसऱ्या झेंड्याच्या मध्यभागी पक्षाचे निवडणूक चिन्ह रेल्वे इंजिन दाखविण्यात आले आहे. या चिन्हाच्याखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना, असा उल्लेख देखील करण्यात आला आहे. मात्र, या झेंड्यात राजमुद्रा वापरण्यावर संभाजी ब्रिगेड आणि काही शिवप्रेमींनी आक्षेप घेतला आहे. मात्र, मनसेच्या या बदलेल्या धोरणामुळे शिवसेनेच्या एका ज्येष्ठ शिवसैनिकाने मनसेला आशीर्वाद दिला आहे.

काय म्हणाल्या मनसे नेत्या रुपाली पाटील?

मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर मनसे नेत्या रुपाली पाटील यांना एका ज्येष्ठ शिवसैनिकांनी कॉल करुन तुम्ही मांडलेली भूमिका योग्य आहे. त्यासाठी तुमचे कौतुक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याबाबत मनसेने ऑडिओ रेकॉर्डिंग ट्विट करत म्हटले की, खरं तर दोन व्यक्तिंमधील खाजगी संभाषण हे जाहीर करु नये, हा संकेत असतो. पण त्या संभाषणाला जर आशीर्वादाची, सदिच्छांची किनार असेल तर कधी संकेतभंग करायला देखील हरकत नाही. तसेच हे ज्येष्ठ शिवसैनिक अनामिक आहोत, पण आम्हाला ते वंदनीय आहेत, असे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

काय म्हणाले ज्येष्ठ शिवसैनिक माधव लेले?

या संवादामध्ये ज्येष्ठ शिवसैनिक माधव लेले म्हणतात की, मी ६७ मधील बाळासाहेबांचा सैनिक आहे. पूर्वी आम्ही मोरारजींची गाडी अडवायला जायचो पण आता अंगात शक्ती राहिलेली नाही. आत्ताचे लोक विचारांशी ठाम नाही. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी ठाम होतो. तसेच रस्त्यावर उतरुन संघर्ष करणे जमले पाहिजे, असे देखील ते पुढे म्हणाले आहे.

दरम्यान, मनसे महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पक्षाच्या नवीन झेंड्याचे अनावरण करणार आहेत. त्यानंतर विविध विषयांवर या अधिवेशनात ठराव मांडले जातील आणि सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास राज ठाकरेंचे भाषण होणार आहे. महाअधिवेशनासाठी राज्यभरातून मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत.


हेही वाचा – ठाकरे vs ठाकरे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -