Saturday, February 27, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी हात प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर मोनिकाच्या हातांना जाणवल्या संवेदना

हात प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर मोनिकाच्या हातांना जाणवल्या संवेदना

चेन्नईच्या एका ब्रेन डेड तरुणामुळे मिळाले मोनिका मोरेला तिचे हात.

Related Story

- Advertisement -

जानेवारी २०१४मध्ये मोनिका मोरे या तरुणीचा घोटकोपर रेल्वे स्थानकात अपघात झाला होता. या अपघातात तिने तिचे दोन्ही हात कोपरापासून गमावले. तिच्यावर मुंबईच्या परळ येथील ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरु होते. २८ ऑगस्ट २०२०मध्ये मोनिकावर हात प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेतून मोनिकाला तिचे खरे खुरे हात परत मिळाले. तिच्यावर प्रत्योरोपित करण्यात आलेले मानवी हात तिचे शरिर स्विकारेल का हा प्रश्न सर्वांना होता. मात्र आता मोनिकाच्या शरिराने तिचे हे नवीन हात स्विकारले आहेत असे म्हणायला हरकर नाही. कारण आता मोनिकाच्या हातांना संवेदना जाणवू लागल्या आहेत. तिच्यासाठी आणि तिच्या कुटुंबियांसाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. मोनिकाच्या या संपूर्ण प्रवासात तिला तिच्या कुटुंबियासोबतच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वेळोवेळी मदत केली. किरीट सोमय्या यांनी आज मोनिकाच्या घरी जाऊन तिची भेट घेतली. तिच्या नवीन नैसर्गिक मानवी हातांसोबतच मोनिकाला तिच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.

- Advertisement -

चेन्नईच्या ग्लोबल रुग्णालयातून एका ब्रेन डेड तरुणाचे हात मोनिकाला देण्यात आले. तरुणाच्या कुटुंबियांच्या समंतीनंतर मोनिकाला हे हात बसवण्यात आले. मुंबईच्या ग्लोबल रुग्णालयातील एकूण १२ डॉक्टरांच्या टिमने मोनिकाच्या या हातांच्या ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया पार पाडली. तब्बल १५ तासांहून अधिक वेळ मोनिकाची शस्त्रक्रिया सुरु होती. हात प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेनंतर ४ आठवड्यांनंतर मोनिकाला रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले.

लोकल आणि प्लॅटफॉर्ममध्ये असलेल्या जास्त अंतरामुळे मोनिकाचा रेल्वे अपघात झाला होता. घाटकोपर रेल्वे स्थानकात रेल्वे पकडत असताना मोनिकाचा अपघात झाला. रेल्वेच्या भोंगळ कारभाराची मोनिका बळी ठरली होती. मात्र मोनिकाने जिद्द न हारता कायम लढत राहिली. तिच्या या जिद्दीचे फळ आता तिला मिळाले. मोनिकाची ही कहाणी अनेकांना प्रेरणा देणारी ठरली आहे.


- Advertisement -

हेही वाचा – आईने ‘माझी गोष्ट’ पूर्ण केली

- Advertisement -