घरमुंबईवाहने न पुरवणार्‍या ट्रॅव्हल्स कंपनीकडून पुन्हा २४६ वाहनांची सेवा

वाहने न पुरवणार्‍या ट्रॅव्हल्स कंपनीकडून पुन्हा २४६ वाहनांची सेवा

Subscribe

मुंबई महापालिकेच्यावतीने अधिकार्‍यांसाठी दैनंदिन वापराकरता बिगर वातानुकूलित गाड्या भाडेतत्वावर घेण्यात येत असतानाही अधिकार्‍यांना मात्र या गाड्या पुरवल्या जात नाहीत. त्यामुळे अनेक अधिकार्‍यांना ओला अथवा उबेर किंवा अन्य टॅक्सीचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे ट्रॅव्हल्स कंपन्या या केवळ गाड्या भाड्याने पुरवण्याची कंत्राटे मिळवत असली तरी प्रत्यक्षात वाहने पुरवत नाही. तरीही आता याच ट्रॅव्हल्स कंपन्यांवर पुन्हा एकदा २४६ वाहने पुरवण्याची जबाबदारी सोपवली जात आहे.

मुंबई महापालिकेच्या विविध विभागांच्या वापरासाठी १००० सीसी व त्यापेक्षा अधिक क्षमता असलेल्या टुरिस्ट परमिटधारक २४६ बिनवातानुकूलित गाड्या भाड्याने पुरवण्यासाठी ट्ॅव्हल्स कंपनीची निवड करण्यात आली आहे. चार टप्प्यांमध्ये ट्रॅव्हल्स कंपनीची निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक वाहनांसाठी मासिक ३६ हजार रुपये दराने गाड्या देण्याची बोली ट्रॅव्हल्स कंपनीने लावली आहे. यापूर्वीचे एक वर्षांचे कंत्राट संपुष्टात आल्याने महापालिकेच्यावतीने पुढील एक वर्षासाठी २४६ वाहने भाड्याने घेतली जात आहेत. यासाठी साडेअकरा कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

- Advertisement -

महापालिकेच्या जी/उत्तर विभागातील काही खातेप्रमुखांना या भाडेतत्वावरील वाहनांची सेवा दिली जाते. परंतु ही वाहने कधीच अधिकार्‍यांच्या सेवेत नसतात. उलट अधिकार्‍यांना टॅक्सी किंवा ओला अथवा उबेरच्या वाहनांची सेवा घेवून कार्यालय तसे घर गाठावे लागते. अधिकार्‍यांकडून नाव न सांगण्याच्या अटीवर मिळालेल्या माहितीनुसार,ख् ट्ॅव्हल्स कंपन्या या अधिकार्‍यांनाच जुमानत नाही. त्यांना जर जाब विचारला तर ते तुम्हाला जे करायचे करा अशी उर्मट उत्तरेही देतात. त्यामुळे काही अधिकार्‍यांना हाताशी धरून ते वाहनांची सेवा मिळाल्याचे कागदपत्रे भरून देतात. त्यामुळे कागदावर ही वाहने पुरवण्याची दाखवली जातात. परंतु एवढी वाहने कधीच अधिकार्‍यांच्या सेवेत नाहीत. तसेच काही प्रकरणांमध्ये तर अधिकार्‍यांना त्यांच्याच वाहनांचा वापर करण्यास सांगून त्यासाठीचे पैसे दिले जातात,अशीही माहिती समोर येत आहे.

शहर १ विभाग
पुरवण्यात येणारी वाहने :५४
कंत्राटदार :अंबाजी ट्ॅव्हल्स
कंत्राट रक्कम : २.४० कोटी रुपये

- Advertisement -

शहर २ विभाग
पुरवण्यात येणारी वाहने :५३
कंत्राटदार :नेहा टेडिंग कंपनी
कंत्राट रक्कम : २.३६ कोटी रुपये

पश्चिम उपनगरे
पुरवण्यात येणारी वाहने :७७
कंत्राटदार :जो एंटरप्रायझेस
कंत्राट रक्कम : ३:४३ कोटी रुपये

पूर्व उपनगरे
पुरवण्यात येणारी वाहने :६२
कंत्राटदार : श्री पार्श्व लॉजिस्टीक
कंत्राट रक्कम : २:७६ कोटी रुपये

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -