राणा दाम्पत्याला सत्र न्यायालयाची नोटीस,आम्ही तुमचा जामीन…

Rana couple responded to the court's notice
Rana couple responded to the court's notice

न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन देताना काही अटी-शर्ती घालून दिल्या होत्या. या अटींचे उल्लंघन झाल्याचा दावा करत सरकारी पक्षाने न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर वकील प्रदीप घरत यांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला नोटीस पाठवली आहे. यामुळे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मुंबई पोलिसांनी रवी आणि नवनीत राणा यांनी त्यांच्या वक्तव्याने जामीन अटीचे उल्लंघन केल्याचा अर्ज न्यायालयात दाखल केला आहे. जामीन आदेशानुसार त्यांचा जामीन रद्द आला आहे आणि या जोडप्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात यावे, अशी मागणी पोलिसांनी केली होती. यानंतर या नोटीसमधून आम्ही तुमचा जामीन रद्द का करू नये, असे स्पष्टीकरण राणा दाम्पत्याकडून मागवण्यात आले आहे. .

न्यायालयाने घातल्या होत्या या अटी –

नवनीत राणा आणि रवी राणा यांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. प्रसारमाध्यमांशी बोलायचे नाही, पोलिस तपासात अडथळे आणायचा नाही, घटनेशी संबंधित साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारे दबाव आणायचा नाही आणि त्यांना प्रलोभने दाखवून त्यांच्यावर प्रभाव टाकायचा नाही. पुन्हा अशा प्रकारच्या गुन्ह्यात सहभाग घ्यायचा नाही, अशा अटी घालत ५० हजार रुपयांची वैयक्तिक हमी आणि तितक्याच रकमेच्या एक किंवा दोन हमीदार देण्याच्या अटीवर जामीन मंजूर करण्यात आला होता.