घरCORONA UPDATEनायर रुग्णालयातील ७ तर कस्तुरबा रुग्णालयातील १ सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण

नायर रुग्णालयातील ७ तर कस्तुरबा रुग्णालयातील १ सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण

Subscribe

नायर रुग्णालयातील सात तर कस्तुरबा रुग्णालयातील एका सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या महापालिकेच्या नायर रुग्णालयातील सात सुरक्षा रक्षकांना कोरोना विषाणूची बाधा झाली असून या आजाराचे मुख्य रुग्णालय असलेल्या कस्तुरबा रुणालयातील एका सुरक्षा रक्षकाला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती हाती येत आहे. त्यामुळे आतापर्यंत महापालिकेच्या एकूण ९ सुरक्षा रक्षकांना आतापर्यंत कोरोनाची बाधा झालेली आहे.

एका महिलेसह सहा सुरक्षा रक्षकांना कोरोनाचीबाधा

मुंबईतील नायर रुग्णालयातील एका महिलेसह सहा सुरक्षा रक्षक तसे महाराष्ट्र सुरक्षा दलाचा एक जवान आदी जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मंगळवारी यासर्वांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. तर कस्तुरबा रुग्णालयातील एका सुरक्षा रक्षकाचाही चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षकही आता कोरोनाच्या जाळ्यात अडकत चालले आहेत.

- Advertisement -

आतापर्यंत रुग्णालयातील डॉक्टर, नर्स,वॉर्डबॉय आदींसह प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ आदींना कोरोनाची बाधा होत असतानाच आता कोरोना रुग्णालयात उपचार करणारा सुरक्षारक्षकालाही याची बाधा होवू लागली आहे. कस्तुरबा रुग्णालयात सुरक्षेसाठी असलेल्या जवानांना कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जावी आणि कशी याबाबतचे प्रशिक्षण दिले आहे. मात्र, बऱ्याचअंशी सुरक्षा रक्षक कामावर येताना मोटरसायकलवरुन येत असतात आणि येताना अन्य कामगाराला सोबत आणत असतो. त्यातूनच हा संसर्ग झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यापूर्वी महापालिकेच्या ए विभागाचा एक सुरक्षा रक्षक आणि वरळी हब येथील एका सुरक्षा रक्षकाला कोरोनाची बाधा झाली होती. यापैंकी वरळी हब मधील सुरक्षा रक्षकाची चाचणी निगेटिव्ह आल्याचेही बोलले जात आहे.

महापालिकेचे प्रमुख सुरक्षा अधिकारी विनोद बाडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला आहे. नायर रुग्णालयात महापालिकेचे सहा सुरक्षा रक्षक, ज्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. यांचे कोरोनाचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत . तर महाराष्ट्र सुरक्षादलाच्या एका जवानाला बाधा झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच कस्तुरबा रुग्णालयातील एका सुरक्षा रक्षकाला बाधा झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – CoronaVirus: वाडीया रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांची आरोग्य सुरक्षावाऱ्यावर 


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -