डोंगर पोखरुन केला रस्ता; सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शनवर गुन्हा

नॅशनल पार्कमधील इको सेन्सीटीव्ह झोनमध्ये सनियंत्रण समितीची परवानगी न घेता रस्ता डोंगर पोखरुन रस्ता तयार करण्यात आला आहे. याप्रकरणी सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Seven Eleven Construction file a lawsuit
डोंगर पोखरुन केला रस्ता; सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शनवर गुन्हा

नॅशनल पार्कमधील इको सेन्सीटीव्ह झोनमध्ये सनियंत्रण समितीची परवानगी न घेता रस्ता तसेच नैसगिक तलाव सुशोभिकरण आणि दगडी गटाराचे बांधकाम केल्याचे प्रकरण नुकतेच उजेडात आले आहे. या प्रकरणी सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन या कंपनीविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती वन मंत्री संजय राठोड यांनी गुरुवारी विधानसभेत लेखी उत्तरात दिली.

डोंगर पोखरुन रस्ता केला तयार

मौजे वसावे शासकीय विश्रामगृहामागे असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये इको सेन्सिटव्ह झोनमध्ये डोंगर पोखरुन रस्ता तयार करण्यात आला आहे. नैसगिक तलावामध्ये भराव टाकण्यात आल्यासंदर्भातील तारांकित प्रश्न आमदार अमित झनक, अमिन पटेल यांच्यासह अनेक मंत्र्यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या लेखी उत्तरात वनमंत्री संजय राठोड यांनी वरील उत्तर दिले आहे. त्याचवेळी दहिसर चेकनाक्यापासून मीरा, काशी, वरसावे, घोडबंदर, चेणे आणि काजूपाड्यापर्यंतच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अधिनस्त वनक्षेत्रात बेकायदा खोदकाम, भराव, बांधकामे होत नसल्याचा खुलासा देखील यावेळी संजय राठोड यांनी लेखी उत्तरात दिले आहे.

संजय राठोड यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रकशन कंपनीविरोधात करण्यात आलेली कारवाई ही ठाणे विभागाकडून करण्यात आलेली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी या मुद्यावर अनेक संघटनांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आता कारवाईच्या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले असून यामुळे पर्यावरण संघटनांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.


हेही वाचा – धक्कादायक! संगणक शिक्षकाकडून १४ विद्यार्थींनीचा विनयभंग