घरमुंबईसेव्हन हिल्स हॉस्पिटल BMC ने ताब्यात घ्यावे; काय आहे काँग्रेसच्या मागणी मागचे कारण

सेव्हन हिल्स हॉस्पिटल BMC ने ताब्यात घ्यावे; काय आहे काँग्रेसच्या मागणी मागचे कारण

Subscribe

मुंबई : अंधेरी येथील अत्याधुनिक सेव्हन हिल्स हॉस्पिटल आरोग्य सेवेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. शहराच्या मोक्याच्या जागी 16 एकर जागेवर असलेल्या 1500 खाटांच्या या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या सोयी सुविधा आहेत. हॉस्पिटल सध्या दिवाळखोरीत निघालेले असल्याने ते मुंबई महापालिकेने ताब्यात घेऊन ‘एम्स’सारखे हॉस्पिटल याठिकाणी सुरू करावे. मुंबई व महाराष्ट्राच्या जनतेला उत्तम आरोग्य सेवा पुरवण्यासाठी हे हॉस्पिटल महत्वाची भूमिका बजावू शकते. खाजगी कंपनीच्या घशात हे हॉस्पिटल घालण्याऐवजी मुंबई महापालिकेनेच ते ताब्यात घ्यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुंबईचे माजी उपमहापौर राजेश शर्मा यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवलं आहे. (Seven Hills Hospital to be taken over by BMC What is the reason behind the Congress demand)

हेही वाचा – दुकानावर ठळक मराठी भाषेतील पाटी हवी म्हणजे हवी; राज ठाकरेंची व्यापाऱ्यांना तंबी

- Advertisement -

राजेश शर्मा यांनी पत्रात म्हटलं की, मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने सार्वजनिक गरजा लक्षात घेऊन व्यापक दृष्टीकोन ठेवण्याची गरज असून प्रगत वैद्यकीय संशोधन केंद्र आणि शिक्षणासह आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉस्पिटल म्हणून विकसित करण्याचा विचार करणे आवश्यक आहे. सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या आवारात शिल्लक असलेल्या जागेवर मेडीकल व नर्सिंग कॉलेज सुरु करता येऊ  शकते. सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या जागेचा मुळ मालकी हक्क मुंबई महानगरपालिकेचा आहे. महानगरपालिकेने ही जागा सेव्हन हिल्स हॉस्पिटलला लीजवर दिलेली आहे. मुंबई महापालिकेने दुसऱ्या कोणत्याही खाजगी कंपनीच्या ताब्यात ती जागा जाऊ न देता स्वतः ताब्यात घेतली तर मुंबईमध्ये एक प्रशस्त, अत्याधुनिक, सर्व सोयीनियुक्त असे महत्वाचा आरोग्य केंद्र बनू शकते.

हेही वाचा – Pankja Munde :’माझा संघर्ष गोपीनाथ मुंडेंपेक्षाही मोठा; मला एकाचवेळी अनेक पातळ्यांवर लढावे लागते’

- Advertisement -

अंधेरीतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या हॉस्पिटलची बाजारभावानुसार 3000 ते 4000 कोटी रुपये किंमत आहे, पण या जागेकडे व्यापारी दृष्टीकोनातून न पाहता मानवी दृष्टीकोनातून त्याकडे पाहिले पाहिजे. याच हॉस्पिटलमध्ये कोराना महामारीच्या काळात कोव्हिड सेंटर उभे केले होते, ज्याचा मुंबईकरांना मोठा फायदा झाला होता. एवढे प्रशस्त व सुविधायुक्त नवीन हॉस्पिटल उभे करणे सोपे नाही. मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, त्यांच्या आरोग्य सेवांसाठी हे हॉस्पिटल एक मोठी संधी आहे. त्यासाठी सध्या असलेल्या सर्व सुविधांचा विचार करता मुंबई महानगरपालिकेने वेळ न घालवता हे हॉस्पिटल ताब्यात घेऊन मुंबईकरांना अत्याधुनिक आरोग्य सेवा देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे राजेश शर्मा यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -