मुंबई : महिलांविरोधातील अत्याचार काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीत. उलट त्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसते आहे. महिला, मुलींना मोठ्या प्रमाणावर छेडछाड, विनयभंग तसेच अगदी लैंगिक अत्याचाराच्या घटनांना सामोरे जावे लागते आहे. अशीच एक घटना घाटकोपरमध्ये उघडकीस आली आहे. (sexual assault on minor girl by threatening to kill her a case has been registered against the accused)
जीवे मारण्याची धमकी देऊन एका तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच ओळखीच्या तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वैभव नावाच्या आरोपी तरुणाविरुद्ध पोलिसांनी लैंगिक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला रुग्णालयात दाखल केले. तेव्हा ती गरोदर असल्याचे तिच्या पालकांना समजले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा – Rahul Gandhi : राहुल गांधींच्या बॅगेची तपासणी आणि खर्गेंचे निवडणूक आयोगाला सवाल
घाटकोपर परिसरात राहणाऱ्या 45 वर्षांच्या तक्रारदार महिलेने या प्रकरणी तक्रार केली आहे. ती पीडितेची आई आहे. मार्च महिन्यांत तिच्या मैत्रिणीने तिची ओळख वैभवशी करून दिली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. याच दरम्यान त्याने तिच्याशी जवळीक साधून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तिने विरोध केल्यानंतर त्याने तिच्यासह तिच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकारामुळे पीडिता प्रचंड घाबरली होती. बदनामीच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. काही दिवसांपासून तिच्या पोटात दुखत होते. त्यामुळे तिला तिच्या आईने जवळच्या शासकीय रुग्णालयात नेले.
रुग्णालयात तपासणी केल्यानंतर ही मुलगी गरोदर असल्याचे तिला सांगण्यात आले. याबाबत तिची चौकशी केल्यानंतर तिने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर या महिलेने घाटकोपर पोलीस ठाण्यात वैभवविरुद्ध तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी वैभवविरुद्ध लैंगिक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. तो पळून गेल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (sexual assault on minor girl by threatening to kill her a case has been registered against the accused)
हेही वाचा – Baba Siddique : सिद्दिकी हत्याप्रकरणी आणखी एक अटक; भारत – पाकिस्तान सीमेवरील गावातून घेतले ताब्यात
Edited by : Ashwini A. Bhatavdekar