घरCORONA UPDATECorona: शाहरुख खान याची सरकारला मदत; आरोग्य मंत्र्यांनी मानले आभार

Corona: शाहरुख खान याची सरकारला मदत; आरोग्य मंत्र्यांनी मानले आभार

Subscribe

बॉलीवूडचा किंग अभिनेता शाहरुख खान याने राज्य सरकारला तब्बल २५ हजार पीपीई किट्ड आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी दिले आहेत.

देशात आरोग्य व्यवस्था दिवसरात्र कोरोना रुग्णांची सेवा त्यांच्यावर उपचार करत असताना आरोग्य खात्यावर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. आरोग्य यंत्रणेतील प्रत्येकाला पीपीई किट्स, मास्क पुरवणे हे सरकारला बंधनकारक आहे. मात्र कोरोनाशी लढा देण्याच्या देशाच्या या मोहिमेत कित्येक सेलिब्रिटींनी, उद्योगपतींनी आपले योगदान दिले आहे. बॉलीवूडचा किंग अभिनेता शाहरुख खान यानेही पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य सरकारला भरघोस अशी मदत दिली आहे. शाहरुख खान याने तब्बल २५ हजार पीपीई किट्ड आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी दिले आहेत. त्यांच्या या योगदानासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांचे आभार मानले आहेत.

- Advertisement -

यापूर्वीही केली आहे सरकारला मदत 

यापूर्वीही शाहरुख खान याने केंद्र व राज्य सरकारला कोविड-१९ च्या संदर्भात लढण्यासाठी आर्थिक मदत केली होती. त्याने पीएम आणि सीएमकरता सहायता निधी दिला होता. तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाहरुखचे आभार मानले होते. तर शाहरुखनेही त्यांना मराठीतून संदेश देत, धन्यवाद म्हटले होते. आता पुन्हा आरोग्य मंत्र्यांच्या ट्विटरवर शाहरुखने रिट्विट करत सरकारच्या कामगिरीसाठी त्यांचे कौतुक केले आहे. तसेच या कठिण प्रसंगी आपण एक आहोत ही भावनादेखील त्याने व्यक्त केली आहे.

हेही वाचा –

लॉकडाऊन योग्यच पण लोकांच्या रोजीरोटीचे काय?; काँग्रेसचा सवाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -