Aryan Khan Drugs Case : आर्यन खानला ड्रग्स प्रकरणातून दिलासा; एनसीबीने दिली क्लीनचिट

Shah Rukh Khans son Aryan Khan gets a clean chit in cruise drugs case details here
Aryan Khan Drugs Case : आर्यन खानला ड्रग्स प्रकरणातून दिलासा; एनसीबीने दिली क्लीनचिट

कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणातून बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी एनसीबीने आज मुंबई सत्र न्यायालात चार्जशीट दाखल केली आहे. यावेळी एनसीबीने या चार्जशीटमधून आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणातून क्लीनचीट दिली आहे. दरम्यान या चार्जशीटसंदर्भातील एनसीबीची एक प्रेस नोट समोर येत आहे. यात आर्यन खानसह ६ जणांवर कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे स्पष्ट केले आहे. एनसीबीने याप्रकरणी 20 आरोपींना अटक केली होती. यातील 6 जणांवर पुराव्याअभावी चार्जशीट दाखल करण्यात आले नाही. मात्र आता उर्वरित 14 आरोपींविरुद्ध दाखल करण्यात आली आहे, एनसीबीचे डीडीजी संजय सिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे. एनसीबीचे डीडीजी संजय सिंह यांच्या सहीची एक प्रेस नोट सध्या समोर येत आहे.

याप्रकरणी तपास करत असलेल्या एसआयटीला कोर्टाने मार्च अखेरीस दिलेली 60 दिवसांची मुदतवाढ दिली. याप्रकरणी आर्यनसह 20 जणांना अटक झाली होती. आता या प्रकरणात आर्यनसह 6 जणांना दिलासा मिळाला आहे. कारण त्याच्या विरोधात आरोपपत्र दाखल झालेलं नाही. एकूण 10 खंडाचे 6000 पानांचे चार्जशीट न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये सबमिट करण्यात आलेलं आहे. कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने आर्यन खानसह 20 जणांविरोधात अटकेची कारवाई केली होती. नार्कोटेक्स कंट्रोल ब्युरोचे संचालक संजय कुमार सिंह यांच्या नेतृत्त्वाखाली काम करणाऱ्या एसआयटीने यासंदर्भातील तपास करत चार्जशीट पत्र तयार केलं आहे. या चार्जशीटमध्ये एनसीबीने म्हटले की, आर्यनकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्स सापडलेले नव्हते. मात्र इतर जे 14 आरोपी आहेत त्यांच्याविरोधात वेगवेगळ्या एनडीपीएस अंतर्गत चार्जशीट दाखल करण्यात आली आहे.

आर्यन खानसह अविन साहू, भास्कर अरोडा, मानव सिंघल, गोपालजी आनंद, समीर सैघन यांच्याविरोधात कोणतेही पुरावे समोर न आल्याने त्यांना एनसीबीने क्लीनचीट दिली आहे.  सध्या उपलब्ध पुराव्यांच्या आधारावर आम्ही अंतिम निर्णय जाहीर करु शकत नाही. या प्रकरणातून समोर आलेल्या व्हॉट्सअॅप चॅटच्या आधारे फक्त आम्ही त्यांनी आरोपी म्हणून सिद्ध करु शकत नाही. असं एनसीबीने म्हटले आहे.

आर्यन खान ड्रग्ज केस
आर्यन खान ड्रग्ज केस

अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यासह नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) च्या चौकशीदरम्यान आर्यन खानला गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती. सुमारे चार आठवड्यांनंतर 30 ऑक्टोबर रोजी तो तुरुंगातून बाहेर आला होता. याशिवाय विक्रांत छोकर, मोहक जैसवाल,इशमित सिंह, गोमती चोप्रा, नूपुर सतीजा, अब्दुल कादर शेख, श्रेयश नायर, मनीष राजगरिया, अविन साहू, समीर सिंघल, मानव सिंघल, भास्कर अरोरा, गोपाल जी आनंद, अचीत कुमार, चीनेडु इग्वे, शिवराज हरिजन, ओकोरो उजेओमा यांनी देखील एनसीबीने अटक केली होती.