घरCORONA UPDATEदिलदार किंग खान! पालिकेच्या मदतीसाठी दिलं चार मजली कार्यालय!

दिलदार किंग खान! पालिकेच्या मदतीसाठी दिलं चार मजली कार्यालय!

Subscribe

शाहरुख खानची आयपीएल टीम कोलकाता नाइट रायडर्स, एटंरटेनमेंट कंपनी रेड चिलीज एटंरटेनमेंट आणि रेड चिलीज वीएफएक्स आणि एनजीओ मीर फाउण्डेशनने मदतीचा हात पुढे केला आहे.

कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी बॉलिवूडच्या किंग खानने किंग स्टाईलने मदत केली आहे. शाहरूखने कोरोना आजारासाठी लागणारी उपकरणे ठेवण्यासाठी त्याचे वांद्रे येथील कार्यालय पालिकेला दिलं आहे. पालिकेने ट्वीट करत शाहरूखचे आभार मानले आहेत.

कार्यालय कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी

वांद्रे येथे अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांचं कार्यालय आहे.  करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पालिकेला मदत मिळावी म्हणून शाहरुखने त्यांच हे कार्यालय पालिकेला क्वॉरंटाइन उपकरणे ठेवण्यासाठी दिलं आहे. या कार्यालयात लहान मुलं, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना लागणारी क्वॉरंटाइनची सर्व उपकरणे ठेवण्यात येणार आहेत.

- Advertisement -

शाहरुख खानची आयपीएल टीम कोलकाता नाइट रायडर्स, एटंरटेनमेंट कंपनी रेड चिलीज एटंरटेनमेंट आणि रेड चिलीज वीएफएक्स आणि एनजीओ मीर फाउण्डेशनने मदतीचा हात पुढे केला आहे. खरंतर मागच्या आठवड्यात ट्विटरवर मदत देत नसल्यामुळे त्यावर टीका देखील करण्यात आली होती. शाहरुखने सोशल मीडियावरून मदतीबाबत माहिती दिली. सोशल मीडियावर शाहरूखने लिहीले आहे की, जे तुमच्यासाठी न थकता काम करत आहेत, त्यांना कदाचित तुम्ही ओळखत नाहीत. पण तरीही त्यांना एकटं वाटू देऊ नका. आपण सगळे एक आहोत याची जाणीव त्यांना करून द्या. संपूर्ण देश आणि सर्व भारतीय एका कुटुंबाप्रमाणे आहेत.

पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना ५० हजार पीपीई किट उपलब्ध करून देणार आहे. मीर फाउंडेशन आणि द अर्थ फाउंडेशनकडून मुंबईतील ५ हजार ५०० कुटुंबियांना एक महिन्याचं जेवण देण्यात येणार आहे. त्याशिवाय दररोज सुमारे दोन हजार लोक जेवू शकतील, असं किचनही तयार करण्यात येणार असल्याची माहिती शाहरुखने दिली आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – टीका झाल्यानंतर आता शाहरूख खान करतोय भरघोस मदत!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -