नियम मोडला असेल तर कायदा सगळ्यांसाठी सारखा – शंभूराजे देसाई

मी मनसेच्या कार्यकर्त्यांना विनंती करेन की पोलीसांना त्यांचे काम करू द्या. आम्ही केलेली कारवाई तुम्हाला योग्य वाटत नसलेत तर तुम्ही न्यायालयात जाऊन न्याय मागा. पण रस्त्यावर उतरून सामान्य लोकांना त्याचा त्रास होऊनये या प्रकारची विनंती मी मनसे आणि राज्यातील जनतेला मी करतो.

Shambhuraj Desai said that action would be taken if MNS broke the law
Shambhuraj Desai said that action would be taken if MNS broke the law

मनसेच्या औरंगाबादच्या सभेवर गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राज्य कायद्याचे आहे. नियम मोडला असेल तर कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यानी मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या रस्त्यावर उतरण्याच्या आवाहनाला उत्तर दिले. ते म्हणाले जर आवाहन आणि विनंती करून कुणी कायदा हातात घेतला तर पोलीस आपली कारवाई करतील असे उत्तर दिले.

औरंगाबादच्या संदर्भात काही अटी आणि शर्ती घालून मनसे आणि राज ठाकरेंच्या सभेला परवानगी दिली होती. त्यामुळे त्याचे उल्लंघन झाले का हे पहायचे काम पोलीस आयुक्त करत होते. माझे त्यांच्याशी बोलणे झालेले नाही. पण कदाचीत त्यांनी ते सगळे तपासले असेल, व्हिडीओ सीडी पाहिल्या असतील आणि जर अटी आणि शर्तींचे उल्लंघन झाल्याची त्यांची खात्री झाली असलेत तर नियमानुसार त्यांनी कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली असेल. कारण माझे अद्याप आयुक्तांशी बोलणे झालेले नाही. पण नियम मोडला असेल तर कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे. व्यक्ती कोण आहे यापेक्षा राज्य कायद्याचे आहे. त्यामुळे कायद्याला अनुसरून नियम आणि अटी घालून परवानगी दिली होती. त्याचे पालन झाले नसले तर आयुक्त त्यांच्या अधिकारात कारवाई करू शकतात किंवा त्यांनी ती केली असेल, असेही गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले.

मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या रस्त्यावर उतरण्याच्या आव्हानाला शभूराज देसाई यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, हे कायद्याचे राज्य आहे. त्याप्रमाणे कारवाई झाली, गुन्हे दाखल झाले तर पुन्हा कायदा हातात घेऊन रस्त्यावर उतरायचे हे महाराष्ट्रात चालणार नाही. हे कायद्याने चालणारे राज्य आहे. पोलीस सक्षम आहेत. दैनंदिन व्यावहार सुरळीत राहतील हे पाहण्याची जबाबदारी आमच्या गृह विभागाची आहे. त्यामुळे अशा सगळ्या परस्थितीला सामोरे जायला आमचे पोलीस दल नेहमी तयार असते. कोणीही कायदा हाता घेण्याची भाषा करू नये. मात्र, जर आवाहन आणि विनंती करून कुणी कायदा हातात घेतला तर पोलीस आपली कारवाई करतील, असाही इशारा त्यांनी दिला.

मी मनसेच्या कार्यकर्त्यांना विनंती करेन की पोलिसांना त्यांचे काम करू द्या. आम्ही केलेली कारवाई तुम्हाला योग्य वाटत नसलेत तर तुम्ही न्यायालयात जाऊन न्याय मागा. पण रस्त्यावर उतरून सामान्य लोकांना त्याचा त्रास होऊ नये या प्रकारची विनंती मी मनसे आणि राज्यातील जनतेला करतो. मी जनतेला महाविकास आघाडीमार्फत आश्वासित करतो की कायदा हातात घेण्याचे कुणी जरी कामे केले तरी आमचे पोलीस ते होऊ देणार नाहीत. पोलीस राज्यभरात सतर्क आहेत. सामान्य माणसाला त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ असे शंभूराजे देसाई म्हणाले.