घरताज्या घडामोडीSharad Pawar health update : शरद पवारांवर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर आहेत तरी...

Sharad Pawar health update : शरद पवारांवर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर आहेत तरी कोण ?

Subscribe

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नियोजित अशी शस्त्रक्रिया ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये बुधवार म्हणजे ३१ मार्च रोजी होणार होती. पण शरद पवारांचा पोटदुखीचा त्रास वाढल्याने त्यांच्यावर मंगळवारीच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय ब्रीच कॅंडीतील डॉक्टरांच्या टीमने घेतला. शरद पवारांवर शस्त्रक्रिया करणाऱ्या टीममध्ये एकुण पाच डॉक्टरांचा समावेश होता. त्यामध्ये सर्वाधिक अनुभवी अशा डॉ. अमित मायदेव यांच्या नेतृत्त्वातच पवारांच्या पित्ताशयाच्या खड्याची म्हणजे गॉलब्लॅडरची शस्त्रक्रिया पार पडली. या टीममध्ये डॉ. अमित मायदेव यांच्यासोबतच डॉ शाहरूख गोलावाला, डॉ आदित्य दप्तरी, डॉ विनित समदानी, डॉ विनित तिब्रेवाला यांच्या टीमने शरद पवार यांची यशस्वीपणे शस्त्रक्रिया पुर्ण केली.

 

- Advertisement -

शरद पवारांवर शस्त्रक्रिया करणारे कोण आहेत डॉ अमित मायदेव ?

डॉ अमित मायदेव हे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि एन्डोस्कोपी एक्सपर्ट आहेत. थेरॅपेटिक एन्डोस्कोपी आणि एऩ्डोस्कोपिक रेट्रोग्रेड कोलॅजिओपॅनक्रिएटोग्राफी (ईआरसीपी) मध्ये त्यांनी नैपुण्य मिळवले आहे. भारत सरकारकडून त्यांना २०१३ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने भारत सरकारकडून गौरविण्यात आले होते. वैद्यकीय आणि वैद्यकीय शिक्षणासाठीच्या योगदानासाठी त्यांना गौरविण्यात आले होते. अमित मायदेव यांचा वैद्यकीय क्षेत्रातील २८ वर्षांचा अनुभव आहे. थिरॅपेटिक एन्डोस्कोपीसाठी ते वैद्यकीय क्षेत्रात परिचित आहेत. यांच्या नेतृत्वातच शरद पवारांच्या पित्ताशयाचे खडे काढण्यात आले. शरद पवार यांचे दुखण वाढल्यानेच त्यांच्यावर एक दिवस आधीच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय या टीमने घेतला होता.

का करावी लागली शस्त्रक्रिया ?

साधारपणपणे पित्ताशयातील ७० टक्के खड्यांचा कोणताही त्रास शरीराला होत नसतो. या खड्यांमधील काही खडे हे सोनोग्राफी केल्यावरही आढळतात. पित्ताशय जाड झाले नसल्यास हे खडे काढण्याची गरज नसते. परंतु शरद पवार यांच्या पित्ताशयातील खड्यांमुळे त्यांना पोटदुखीचा त्रास वाढल्यानेच त्यांच्या गॉलब्लॅडरची शस्त्रक्रिया करण्यात आली. नियोजित शस्त्रक्रिया ही ३१ मार्चला असतानाही त्यांना या खड्यांचा त्रास होऊ लागल्यानेच त्यांच्यावर एक दिवस आधीच शस्त्रक्रिया झाली. पण आगामी काळात पित्ताशय काढून टाकण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. पवारांवर गॉलब्लॅडरची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्या पुरेशा विश्रातीनंतरच त्यांचे पित्ताशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया होऊ शकते. राज्याच्ये आरोग्यमंत्री यांनीही पवारांच्या आरोग्याबाबतची माहिती देतानाच ही गोष्ट सांगितली आहे.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -