Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी शरद पवार दुट्टपी, महाराष्ट्रातील जनता बघतेय- अतुल भातखळकर

शरद पवार दुट्टपी, महाराष्ट्रातील जनता बघतेय- अतुल भातखळकर

Related Story

- Advertisement -

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेने लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप केला आहे. यामुळे भाजपने मुंडे यांना लक्ष्य केलं असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र सुरुवातीला मुंडेवरील आरोप गंभीर असल्याचे सांगणारे अध्यक्ष शरद पवार यांनी आता सावध पवित्रा घेतला आहे. त्यामुळे भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी पवार दुटप्पी असल्याचा आरोप केला आहे.

रेणू शर्मा या महिलेने मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. त्यावर मुंडे यांनी खुलासा दिला. या खुलाशात त्यांनी रेणू शर्मा हिची बहिण करूणा शर्मा हिच्याशी आपले गेल्या अनेक वर्षांपासून सहमतीने संबंध असल्याचे सांगितले होते. तसेच त्यांना दोन मुलंही असल्याचं त्यांनी खुलाशात जाहीर केलं.

- Advertisement -

मुंडे यांच्या य़ा स्पष्टीकरणानंतर भाजपने त्यांना घेरण्यास सुरुवात केली आहे. मुंडे यांनी प्रतिज्ञापत्रात संबंधित महिलेपासून त्यांना दोन अपत्य असल्याची माहिती दडवली. त्यामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप करत आहे. पण चौकशी करुन निर्णय घेऊ असा पवित्रा शरद पवार यांनी घेतल्याने भाजप नेत्यांनी पवारांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे.


हे ही वाचा – धनंजय मुंडेंना शरद पवारांकडून क्लीन चिट


- Advertisement -

 

- Advertisement -