घरताज्या घडामोडीमाझ्या ५० वर्षांच्या कारकिर्दीत असं कधी घडलं नाही, पण इथे वेगळंच घडतंय...

माझ्या ५० वर्षांच्या कारकिर्दीत असं कधी घडलं नाही, पण इथे वेगळंच घडतंय – शरद पवार

Subscribe

‘मी गेल्या ५० वर्षांपासून सक्रीय राजकारणात आहे. माझ्या गेल्या ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत असं कधीही घडलं नाही. पण इथे काहीतरी वेगळं घडतंय. बघुयात काय होतंय’, अशी अप्रत्यक्ष टीका करणारी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी दिली आहे. राज्य सरकारने राज्यपालांना पाठवलेल्या १२ खासदारांच्या यादीला अद्याप मंजुरी देण्यात आलेली नाही. यासंदर्भात शरद पवारांना पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी याविषयी सविस्तर प्रतिक्रिया दिली. आज सकाळी शदर पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. यामध्ये दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनासोबतच राज्यपालांकडून नावांना मंजुरी देण्यासाठी होत असलेल्या दिरंगाईबाबत देखील त्यांनी आपलं म्हणणं स्पष्ट केलं.

मंत्रिमंडळाची संमती असूनही…

यावेळी बोलताना शरद पवारांनी राज्यपालांवर थेट टीका न करता अप्रत्यक्षपणे आपली आश्चर्यवजा नाराजी व्यक्त केली. ‘राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने, मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावांना मंजुरी दिल्यानंतर ती यादी राज्यपालांकडे गेल्यावर तिला राज्यपालांनी मंजुरी दिली नाही, असं आजपर्यंत घडलं नाही. पण इथे काहीतरी वेगळंच घडतंय’, असं ते म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – मलाही मुख्यमंत्री व्हावंसं वाटलं तर काय करू? – शरद पवार

केंद्राच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नव्हती

दरम्यान, शरद पवारांनी यावेळी केंद्रातील भाजप सरकारवर देखील निशाणा साधला. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी राज्यातील काही नेतेमंडळी आणि सेलिब्रिटींची सुरक्षा कमी केली. मात्र, यानंतर केंद्र सरकारने राज्यातल्या काही व्यक्तींना केंद्र सरकारची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला. यावर बोलताना पवार म्हणाले, ‘राज्य सरकार जेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेबाबत निर्णय घेतं, त्यात केंद्र सरकारने हस्तक्षेप करायची आवश्यकता नव्हती. पण त्यांनी तो केला. त्यावर आमची काही तक्रार नाही. देवेंद्र फडणवीसांचं सरकार असताना माझीही सुरक्षा काढली होती. पण मला त्याचा कधी काही त्रास झाला नाही. पण या प्रकरणी केंद्रानं राज्य सरकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत निर्णय घेण्याच्या अधिकारात हस्तक्षेप करणं हे हास्यास्पद आहे.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -