Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई पक्षातील लोकशाहीने मंजूर केलेला ठराव शरद पवार यांनी मान्य करावा - धनंजय मुंडे

पक्षातील लोकशाहीने मंजूर केलेला ठराव शरद पवार यांनी मान्य करावा – धनंजय मुंडे

Subscribe

मुंबई : शरद पवारांनी (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर एक निवड समिती नेमण्यात आली होती. या निवड समितीने एक मताने शरद पवारांचा राजीनामा नामंजुर केला आहे. यानंतर बोलताना राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, पक्षातील लोकशाहीने मंजूर केलेला ठराव शरद पवार यांनी मान्य करावा.

धनंजय मुंडे म्हणाले की, कार्यकर्त्यांना जे अपेक्षित होते, तोच निर्णय बैठकीत झाला आहे. शरद पवार यांनी समिती गठीत केली होती, त्या समितीने एक मताने हा निर्णय केला आहे की, शरद पवार यांनी अध्यक्ष पदावरून कमी होण्याचा निर्णय अमान्य केला आहे. आमच्या सर्वांची इच्छा होती, कार्यकर्त्यांची भावना होती की, शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा. तो निर्णय बैठकीत झाल्यामुळे आता कुठेही सस्पेंस राहिलेला नाही आहे. आम्ही सर्व जाऊन शरद पवार यांना विनंती करणार आहोत त्यांनी राजीनामा मागे घ्यावा. शेवटी हा सर्वांनुमते समितीने केलेला ठराव आहे आणि मला असे वाटते की, ज्या पद्धतीने शरद पवार यांनी आजपर्यंत लोकशाहीचे पालन केले आहे, त्याप्रमाणे पक्षाच्या लोकशाहीने शरद पवार यांनीच पक्षाचे अध्यक्ष राहावे असा ठराव केला आहे, तो  त्यांनी मान्य करावे, असे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – …तर मी पुन्हा आत्महत्या करेल; भिवंडी राष्ट्रवादीच्या युवा अध्यक्षाचा इशारा

कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
आज होणाऱ्या बैठकीसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर एकच गर्दी केली आहे. एकीकडे कार्यालयाच्याबाहेर कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे भजन-कीर्तन करण्यात येत आहे. शरद पवार यांनी घेतलेला निर्णय त्वरीत मागे घ्यावा. तसेच याबाबत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी वारकरी संप्रदायातील कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली आहे.

- Advertisement -

विरोधी पक्षातील नेत्यांचा शरद पवारांना फोन
काल गुरुवारी (04 मे) काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन यांनी सुप्रिया सुळे यांच्याशी फोनवरून संवाद साधला होता. तर आज जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला, माकपचे नेते सीताराम येचुरी, आपचे नेते संजय सिंग आणि सीपीआयचे नेते डी. राजा यांनी फोन करून संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisment -