घरमुंबईनारायण राणेंच्या बंडाला शरद पवारांची फूस, दीपक केसरकरांचा दावा

नारायण राणेंच्या बंडाला शरद पवारांची फूस, दीपक केसरकरांचा दावा

Subscribe

मुंबई : शिवसेनेतील शिंदे गटाने आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नारायण राणे यांच्यासह शिवसेनेतील आजवरच्या फुटीमागे शरद पवार असल्याचा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे.

राष्ट्रपती निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बैठक बोलावली असून त्या बैठकीसाठी केसरकर नवी दिल्ली येथे गेले आहेत. तिथे माध्यमांशी बोलताना त्यांनी शरद पवारांवर टीका केली. कुणालाही मंत्रीपदाची म्हणून शपथ देऊ नये, असे पत्र शिवसेनेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले आहे. त्याबद्दल विचारले असता, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चुकीच्या नेत्यांकडून मार्गदर्शन होत आहे, असे मला वाटते. त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले असावे, असे सांगत दीपक केसरकर यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांकडे अंगुलीनिर्देश केले. त्यानंतर थेट शरद पवारांवर निशाणा साधतान केसरकर म्हणाले, आजपर्यंत राज्यात शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली आहे, त्या प्रत्येक फुटीमागे शरद पवार यांचा हात आहे. ही वस्तुस्थिती आहे. नारायण राणे यांच्याबाबतीतही हेच घडल्याचा दावा त्यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळेच मी आज मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंनी केले शिवसेनाप्रमुखांना स्मरण

शिवसेनेत राहून शाखाप्रमुख ते मु्ख्यमंत्री असा प्रवास असलेल्या नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आले होते. 1999 साली उद्धव ठाकरे यांनी आम्हाला अंधारात ठेवून उमेदवारांची नावे परस्पर बदलली, असा आरोप नारायण राणे यांनी आपल्या आत्मचरितून केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी 2003 साली महाबळेश्वर येथील अधिवेशनात उद्धव ठाकरे यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी निवड केली. त्यावेळी नारायण राणे प्रचंड दुखावले गेले. उद्धव ठाकरे यांच्यामुळे आपली दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याची संधी गेली, असे राणे यांनी नमूद केले आहे.

- Advertisement -

राणेंनी रंगशारदा इथल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात, शिवसेनेमध्ये पदांचा बाजार मांडला जात असल्याचे वक्तव्य केले होते. बाळासाहेब ठाकरेंनी या मेळाव्यातच शिवसैनिकांना संबोधित करताना राणेंच्या या वक्तव्याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. 2004 साली नारायण राणे विरोधी पक्षनेते होते. ते परदेशात गेले होते. ते परत आले तेव्हा त्यांच्याविरोधातली नाराजी विकोपाला गेली होती. त्याबद्दल त्यांनी बाळासाहेबांशी चर्चाही केली होती. पण 2005मध्ये खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी राणेंची शिवसेनेतून हकालपट्टी केली होती.

नारायण राणे यांच्या बंडामागे शरद पवार होते. राणे यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यास मी मदत केली असली तरी, त्यांनी कोणत्या पक्षात जावे, ही अट मी घातलेली नव्हती, असे खुद्द शरद पवार यांनीच मला सांगितल्याचा दावाही केसरकर यांनी केला आहे.

हेही वाचा – माझ्या गुरुंसोबत, सदैव! आदित्य ठाकरेंनी शेअर केला वडील-आजोबांसोबतचा जुना फोटो

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -