घरमुंबईभाजप देशात जातीयद्वेषाचं विष पसरवतय, शरद पवारांची मोदींवर खोचक टीका

भाजप देशात जातीयद्वेषाचं विष पसरवतय, शरद पवारांची मोदींवर खोचक टीका

Subscribe

नरेंद्र मोदी भाषण करण्यासाठी जाऊ शकतात परंतु शेतकरी आंदोलकांना भेटण्यासाठी वेळ नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे असर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपावर गंभीर टीका केली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार रांचीमध्ये आयोजित केलेल्या सभेत बोलत होते. यावेळी शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत म्हटले आहे की, भाजपच्या हातात सत्ता गेल्यानंतर देशात जातीयद्वेषाचं विष वाढत आहे. देशाची आर्थिक स्थिती ढासळली आहे. देशातील अन्नदाता शेतकरी गेले कित्येक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. परंतु पंतप्रधान मोदींकडे परदेशात जायला वेळ आहे. सभेत हजर राहला वेळ आहे परंतु शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही असा टोला राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परदेशात जाण्यासाठी वेळ आहे. पश्चिम बंगालमध्ये सभा घेण्यासाठी वेळ मिळाला परंतु दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांची भेट घ्यायला त्यांच्याकडे वेळ नाही असा टोला शरद पवार यांनी पंतप्रधानांना लगावला आहे. तसेच भाजपच्या हातात सत्ता गेल्यापासून देशात जातीयद्वेषाचं विष वाढत असल्याचे धक्कादायक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

हेही वाचा : ममता दीदींनी बंगालचा विश्वासघात केला, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल


तसेच शरद पवार यांनी असे म्हटले आहे की, भाजप देशात जातीयद्वेषाचं विष पसरवत आहे. पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करण्यासाठी जाऊ शकतात परंतु शेतकरी आंदोलकांना भेटण्यासाठी वेळ नाही. देशात बंधूभाव प्रस्थापित करणे ही केंद्राची जबाबदारी आहे. परंतु भाजप जातीयद्वेष पसरवत आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -