Share Market : जागतिक बाजारातील कमजोरीमुळे आज (20 सप्टेंबर) भारतीय शेअर बाजारात (Share Market) मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. सेन्सेक्स जवळपास 800 अंकांनी तर, निफ्टी सुमारे 19,900 जवळपास घसरल्याचे पाहायला मिळाले. व्यापक बाजारही लाल रंगात बंद झाल्यामुळे आज गुंतवणूकदारांचे सुमारे अडीच लाख कोटी रुपये बुडाले आहेत. (Share Market Big fall in Indian stock market Investors lost two and a half lakh crore rupees)
आज व्यवहाराच्या शेवटच्या सत्रात 30 शेअर्सचा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) सेन्सेक्स 796.00 अंक किंवा 1.18 टक्क्यांनी घसरून 66,800.84 वर बंद झाला. त्याचवेळी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 222.85 अंक किंवा 1.11 टक्क्यांनी घसरला आणि 19,910.45 च्या पातळीवर बंद झाला.
हेही वाचा – Justin Trudeau : वडिलांच्या चुकीची ट्रूडोंकडून पुनरावृत्ती! खलिस्तान मुद्द्यावरून भारत-कॅनडाचा वाद शिगेला
गुंतवणूकदारांचे अडीच लाख कोटी रुपये बुडाले
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 320.66 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच सोमवारी (18 सप्टेंबर) 323.00 लाख कोटी रुपये होते. आज सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप सुमारे 2.34 कोटी रुपयांनी कमी झाले आहेत म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 2.34 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.
सेन्सेक्समध्ये सर्वाधिक वाढ आणि घसरण झालेल्या कंपन्या
सेन्सेक्समधील 30 पैकी केवळ 7 कंपन्या आज वाढीसह बंद झाल्या आहेत. यामध्ये पॉवर ग्रिड शेअर्समध्ये सर्वाधिक 2.45 टक्के वाढ झाली आहे. यानंतर एशियन पेंट्स, सन फार्मा, Axis बँक आणि एनटीपीसीचे शेअर्स वधारले आणि 0.25 टक्के ते 0.61 टक्क्यांपर्यंत वाढीसह बंद झाले. तर सेन्सेक्सचे उर्वरित 23 कंपन्या आज लाल रंगात बंद झाल्या आहेत. त्यापैकी एचडीएफसी बँकेच्या कंपन्यांचे शेअर सर्वाधिक 3.84 टक्क्यांनी घसरले आहेत. याशिवाय जेएसडब्ल्यू स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज, अल्ट्राटेक सिमेंट आणि मारुती सुझुकीच्या शेअर्समध्ये 1.45 ते 2.51 टक्क्यांची घसरण दिसून आली.
हेही वाचा – महिला आरक्षणाचा लॉलीपॉप बनवला; भाजपा खासदाराचे सोनिया गांधींना प्रत्युत्तर
2,103 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घरसण
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) वर आज शेअर्सची संख्या वाढीच्या तुलनेत घसरणीसह बंद झाल्याचे पाहायला मिळाले. बीएसईमध्ये आज एकूण 3,803 शेअर्सचे व्यवहार झाले. मात्र यातील 1,555 शेअर्स वाढीसह बंद झाले तर, 2,103 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. विशेष म्हणजे 145 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतेही चढउतार न होता बंद झाले. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 198 कंपन्यांनी त्यांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकाला स्पर्श केला आहे तर, 19 कंपन्यांनी त्यांच्या 52 आठवड्यांच्या नीचांकाला स्पर्श केला आहे.