घरमुंबईशर्मिला ठाकरे यांची पूजा चव्हाण प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया

शर्मिला ठाकरे यांची पूजा चव्हाण प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया

Subscribe

राज्यात अनेक अत्याचाराच्या घटना घडतात

पूजा चव्हाणला आत्महत्या करुन १८ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. परंतु पूजा चव्हाणने आत्महत्या केली की हत्या याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. पूजा चव्हाण प्रकरणात समोर आलेले फोटो आणि व्हिडिओ क्लिप्स प्रकरणात वनमंत्री संजय राऊत अडचणीत सापडलेले आहेत. त्यांच्यावर अद्याप कारवाई करण्यात आली नाही. यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी भाष्य केले आहे. पूजा चव्हा प्रकरणात सखोल चौकशी आणि कारवाईची गरज असल्याचे शर्मिला ठाकरे यांनी म्हटले आहे.

मराठी भाषा दिनानिमित्त मनसेने मराठी स्वाक्षरी कार्यक्रम मुंबईतील शिवाजी पार्क येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमास मनसे अध्यक्ष राज ठाकरे सपत्नीक उपस्थित होते. यावेळी शर्मिला ठाकरे यांना पूजा चव्हाण प्रकरणावरुन प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी म्हटले की, तुम्ही हा प्रश्न चुकीच्या माणसाला विचारताय आम्ही सरकारमध्ये नाही. परंतु महिला म्हणून या प्रकरणामध्ये कारवाईची गरज आहे. तसे पाहिले तर राज्यात अनेक अत्याचाराच्या घटना घडतात परंतु सगळीकडे कारवाईची गरज आहे. मीडियाने हे प्रकरण लावून धरल्यामुळे आभार अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी दिली आहे.

- Advertisement -

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अडकलेले वनमंत्री व शिवसेनेचे संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. तसेच येत्या सोमवारपर्यंत (१ मार्च२०२१) संजय राठोड यांच्यावर कारवाई तसेच त्यांचा राजीनामा घेतला नाहीतर विधानसभेत सरकारला तोंडही उघडू देणार नाही असा इशाराच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. पूजा चव्हाण प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करत भाजप महिला मोर्चाने राज्यभर चक्का जाम आंदोलन करत महामार्ग अडवू धरला होता. आंदोलन करणार्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.


हेही वाचा : राज्यात प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तकाचं गाव असावं, मुख्यमंत्र्यांचा संकल्प

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -