घरमुंबईशताब्दी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी केले काम बंद आंदोलन

शताब्दी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी केले काम बंद आंदोलन

Subscribe

कांदिवली शताब्दी हॉस्पिटलच्या डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळी दोन तास काम बंद आंदोलन केले होते.

कांदिवली शताब्दी हॉस्पिटलच्या डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळी दोन तास काम बंद आंदोलन केलं. बुधवारी, रात्री एका दारु प्यायलेल्या महिलेला पोलीस काही कारणासाठी शताब्दी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते. हिमानी शर्मा असे त्या महिलेचे नाव होते. या महिलेने रात्री हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालत डॉक्टर्स, स्टाफ आणि कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला. या वादात या महिलेने पोलीस आणि हॉस्पिटलच्या डॉक्टरांना मारहाण देखील केली. याच पार्श्वभूमीवर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद करण्याचा निर्णय घेतला.

एका महिलेने हॉस्पिटलमध्ये काल रात्री गोंधळ घातला. या महिलेने पोलीस आणि ऑन ड्युटी असणाऱ्या कर्मचारी आणि डॉक्टरांना मारहाण केली. त्यामुळे सकाळपासून डॉक्टरांनी काम बंद करण्याचा निर्णय घेतला. सकाळी आठ वाजताची ओपीडी बंद होती. पण, आता पुन्हा काम सुरू झाले आहे. डॉक्टर्स आणि कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले आहेत.
– डॉ. प्रदीप आंग्रे, वैद्यकीय अधीक्षक, शताब्दी हॉस्पिटल

- Advertisement -

त्यानुसार, हॉस्पिटलमधील ओपीडी सकाळी बंद ठेवण्यात आली होती. सकाळी ८.१५ वाजता ओपीडी स्लिप काउंटर बंद करून सर्व रुग्णांना बाहेर काढलं गेलं. त्यामुळे, सर्व रुग्ण आरडाओरड करत होते. शिवाय, सकाळपासून सुरू असलेल्या गोंधळामुळे रुग्णांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

यावेळी कर्मचाऱ्यांना कोणतीही सुरक्षा नसल्याचे सांगण्यात आले. तसेच,  अनेक पदे रिक्त असून सर्जरी विभागही बंद आहे. हॉस्पिटलमध्ये संपूर्ण सुरक्षा महत्त्वाची असून त्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, तसेच रिक्त पदे त्वरित भरावीत, प्रत्येक विभागात त्याच विभागातील रुग्ण दाखल करावा, जेवढे बेड असतील तेवढेच रुग्ण दाखल करून घ्यावेत, कर्मचारी पालिकेचे आणि कायम स्वरुपी असावेत. सर्जिकल ओपीडी बंद आहे ती सुरू करावी. तसेच राजकीय हस्तक्षेप कमी करावा,  अशा मागण्या करण्यात आल्या. या मागण्या १५ दिवसांच्या आत पूर्ण करण्याचा वेळ दिला असल्याचं आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अॅड. प्रकाश देवदास यांनी सांगितलं.

- Advertisement -

या हॉस्पिटलमध्ये मालाड, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली ते वसई, पालघर पासून आणि काही रुग्ण ठाण्यावरून ही येतात. पण, आज सकाळपासून ओपीडी बंद असल्याकारणाने रुग्णांना परत फिरावं लागलं.

हेही वाचा –

साताऱ्यात भूकंपाचे सौम्य धक्के

राष्ट्रपतींचा पाच वर्षाचा रोडमॅप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -