तीन महिन्यानंतर शौविक चक्रवर्तीला जामीन मंजूर

५ सप्टेंबरला शौविकला एनसीबीकडून अटक करण्यात आली होती.

Shauvik Chakraborty granted bail after three months
तीन महिन्यानंतर शौविक चक्रवतीला जामीन मंजूर

बॉलिवुड आभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या भावाला एनडीपीएस कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूमुळे ड्रग्ज कनेक्शन समोर आले. त्यात सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिचा भाव शौविक चक्रवर्तीला एनसीकडून अटक करण्यात आली होतीय. ड्रग्जचे सेवन आणि विक्री केल्याप्रकरणी शौविकवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ५ सप्टेंबरला शौविकला एनसीबीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल तीन महिन्यानंतर शौविकला जामीन देण्यात आला आहे.

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणानंतर बॉलिवुडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आले. यात रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्यावर एनसीबीकडून अटक करण्यात आली. त्याला आता एनडीपीएस कडून जामीन देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच रिया चक्रवर्तीलाही जामीन देण्यात आला.

शौविक चक्रवतीने मुंबईच्या विशेष एनडीपीएस न्यायालयात नवीन जामीन याचिका दाखल करण्यात आली होती. कोर्टाने या आधीही शौविक चक्रवर्तीच्या जामीनाचा अर्ज फेटळला होता. अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि शौविक चक्रवर्ती ड्रग्ज कनेक्शनमध्ये सहभागी असल्याचे काही पुरावे मिळाले होते. शौविकच्या ड्रग्ज विक्रीतील काही चॅटिंग समोर आल्याने शौविकचे ड्रग्ज व्यापाराशी असलेले संबंध समोर आले. त्यामुळे शौविकला एनसीबीकडून अटक करण्यात आली होती. एनसीबीच्या कडक कारवाई नंतर शौविक चक्रवर्तीला आता तीन महिन्यांनतर जामीन देण्यात आला आहे.


हेही वाचा – संजय राऊत यांच्यावर होणार अँजिओप्लास्टी; लिलावतीत दाखल