घरमुंबईअसही तुमच बाळ मरणारचं होतं; रुग्णालयाकडून भरपाई देण्यास नकार

असही तुमच बाळ मरणारचं होतं; रुग्णालयाकडून भरपाई देण्यास नकार

Subscribe

कामगार रुग्णालयात लागलेल्या आगीत एका नवजात बाळाचा मृत्यू झाला होता. मृत झालेल्या बाळाची नुकसान भरपाई म्हणून १० लाख देण्याऐवजी २ लाखाची रक्कम देण्यात आली. याबाबत विचारणा केली असता तुमचे बाळ असेही मरणारचे होते असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.

अंधेरी मधील मरोळ या ठिकाणी कामगार रुग्णालयाला १७ डिसेंबर रोजी आग लागली होती. या घटनेमध्ये १४७ रुग्ण जखमी झाले आहेत तर एकूण ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना १० लाखाची तर जखमी झालेल्यांना दोन लाखाची मदत जाहीर करण्यात आली होती. मात्र या घटनेमध्ये २१ डिसेंबर रोजी होली स्पिरीट रुग्णालयात एका नवजात अर्भकाचा मृत्यू झाला होता. मात्र या बाळाच्या नातेवाईकांना मृत्यू झाला तरी दहा लाखाची मदत देण्यात आली नाही. या बाळाच्या नातेवाईकांना २ लाख रुपये देण्यात आले होते. याबाबत नातेवाईकांनी विचारणा केली असता. तुमची मुलगी अशीही मरणारच होती. त्यामुळे १० लाखाची मदत देण्यास रुग्णालयाकडून नुकसान भरपाई देण्यास नकार देण्यात आला आहे.

नेमके काय घडले?

मरोळ येथे कामगार रुग्णालयाला भीषण आग लागल्याची घटना १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली होती. या घटनेमध्ये एकूण १४७ लोक जखमी झाले होते. तर या घटनेमध्ये त्याच दिवशी सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र या दुर्घटनेत आता पर्यंत अकरा जणांचा बळी गेला आहे.

- Advertisement -

असा झाला नवजात अर्भकाचा मृत्यू

या घटनेमध्ये जखमी झालेल्या नवजात बालकांना होली स्पिरीट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एका महिलेला नऊ महिने पूर्ण होण्याच्या आधी त्या महिलेने जुळ्या बाळाला जन्म दिला होता. त्यामध्ये एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. रुग्णालयाने मुलीचा नऊ महिने पूर्ण होण्याआधीच जन्म झाला होता, तसेच तिची प्रकृतीही गंभीर होती त्यामुळे तिचा असाही मृत्यू होणार होता असं सांगत कुटुंबाला १० लाखांची नुकसान भरपाई देण्यास नकार दिला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी मुलीचा मृत्यू झाला. या घटनेमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये दोन नवजात बाळांचा समावेश आहे. रुग्णालयाने अंधेरीत सोमवारी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जखमी तसेच मृत्यू पडलेल्यांना नुकसान भरपाईचे चेक देण्यात आले. मृतांना १० लाख तर जखमींना दोन लाखांची नुकसान भरपाईचे चेक देण्यात आले आहेत. मात्र विरारमधील दांपत्याला मुलीचा मृत्यू झाला असतानाही दोन लाखांचा चेक देण्यात आला. काही वेळाने अनिल आणि ललिता यांना जखमी झालेल्या दुसऱ्या मुलासाठीही त्याच रक्कमेचा चेक देण्यात आला असून यांच्या मुलावर सध्या होली स्पिरीट रुग्णालयात दाखल आहे.
तुम्ही दिलेली ही रक्कम आमच्या मुलीची नुकसान भरपाई करु शकत नाही, पण तिचा आगीमुळे मृत्यू झाला हे ते कसं फेटाळून लावू शकता असा सवाल ललिता यांनी विचारला आहे. रुग्णालयाने लावलेल्या मृत आणि जखमींच्या यादीत त्यांच्या मुलीचं नाव जखमींमध्ये असल्याचं अनिल यांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

जखीमींमध्ये मुलीचे नाव

आमच्या मुलीचा मृत्यू झाला तरी आमच्या मुलीचे नाव जखमींच्या यादीत टाकण्यात आले आहे. यापैकी कोणतीही रक्कम आमचत्या मुलीच्या नुकसान भरपाई करु शकत नाही. पण तिचा आगीमुळे मृत्यू झाला हे ते कसं काय फेटाळून लावू शकतात, असा सवाल ललिता यांनी विचारला आहे. आम्ही रुग्णालयाला त्यांची चूक लक्षात आणून दिली, मात्र त्यांना तिचा मृत्यू झाल्याचं आधीपासूनच माहिती असल्याचं आम्हाला कळलं असं अनिल यांनी सांगितलं आहे.

जी काही रक्कम मिळत आहे ती घ्या

अधिकाऱ्यांनी आम्हाला चेक घेण्याचा आग्रह केल्याचे अनिल यांनी सांगितले. तसेच जी काही रक्कम मिळत आहे ती घ्या आणि हा प्रकार रुग्णालयाच्या वरिष्ठांपर्यंत घेऊन जा असे देखील सांगितले असल्याची माहिती अनिल यांनी दिली आहे. जर आम्ही हा चेक परत केला तर कदाचित मोकळ्या हातानेच परतावं लागेल या भीतीने आम्ही चेक स्विकारला असल्याचे अनिल यांनी सांगितले आहे.


वाचा – रुग्णालयात आग; नवजात अर्भकाचा मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -