घरमुंबईव्हायरल व्हिडिओनंतर शीतल म्हात्रेंचा अज्ञातांकडून पाठलाग, दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

व्हायरल व्हिडिओनंतर शीतल म्हात्रेंचा अज्ञातांकडून पाठलाग, दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Subscribe

शिवसेनेच्या (शिंदे गट) शीतल म्हात्रे या व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आल्या आहेत. पण एका संशयित व्यक्तीकडून त्यांचा पाठलाग करण्यात येत असल्याची माहिती आता शीतल म्हात्रे यांच्याकडून देण्यात आली आहे. याबाबतची तक्रार त्यांनी दादर पोलीस ठाण्यात देखील दाखल केली आहे.

शिवसेनेच्या (शिंदे गट) शीतल म्हात्रे या व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आल्या आहेत. पण एका संशयित व्यक्तीकडून त्यांचा पाठलाग करण्यात येत असल्याची माहिती आता शीतल म्हात्रे यांच्याकडून देण्यात आली आहे. याबाबतची तक्रार त्यांनी दादर पोलीस ठाण्यात देखील दाखल केली आहे.

एका व्यक्तीकडून पाठलाग करण्यात येत असल्याची माहिती काल शिवसेनेच्या (शिंदे गट) शीतल म्हात्रे यांच्याकडून प्रसार माध्यमांना देण्यात आली होती. आता या घटनेची तक्रार शीतल म्हात्रे यांच्याकडून करण्यात आली आहे. दादर पोलीस ठाण्यामध्ये जाऊन शीतल म्हात्रे यांनी तक्रार दाखल केली आहे. यावेळी शिवसेनेच्या दादर येथील महिला पदाधिकाऱ्यांसह आमदार सदा सरवणकर हे सुद्धा शीतल म्हात्रे यांच्यासोबत पोलीस ठाण्यात पोहोचले होते.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, शीतल म्हात्रे आणि मागाठाणे विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शीतल म्हात्रे यांनी हा व्हिडीओ मॉर्फ केला असल्याचे सांगितले. तसेच एक अनोळखी व्यक्ती त्यांचा पाठलाग करत असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली होती. याचबाबत आता शीतल म्हात्रे यांनी दादर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे. तर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर शीतल म्हात्रेंचा पाठलाग करणारा संशयित ताब्यात घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताची ओळख परेड घेण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा – “अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे द्या, पण…” सुप्रीम कोर्टात शिंदे गटाच्या वकिलांचा आक्रमक युक्तिवाद

- Advertisement -

दरम्यान, आता सध्या सर्वच लोकांवर संशय घेण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. सर्वांना माहित आहे की, कोणता पक्ष खालच्या पातळीवर जाऊन असे काम करू शकतो, याबाबत नेहमी बोलणार नाही. पण ही एखाद्याची अशा पद्धतीने बदनामी करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असे मत शीतल म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे.

शनिवारी दहिसर येथे आमदार प्रकाश सुर्वे यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांनी या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रित केले होते, तसेच यावेळी त्या विभागामधून रॅलीचे देखील आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमधील प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यामुळे ठाकरे गटाकडून बदनामी करण्यात येत असल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -