Thursday, July 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मुंबई ...म्हणून सचिन वाझेंमुळे शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राची अटक ५ महिन्यांसाठी...

…म्हणून सचिन वाझेंमुळे शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राची अटक ५ महिन्यांसाठी टळली

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना पॉर्न फिल्म्स तयार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केली आहे. राज कुंद्रा हे या प्रकरणातील प्रमुख सुत्रधार असल्याचा आरोप झाला. मात्र या प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा समोर आला आहे. यानुसार, मुंबई पोलिसांनी राज कुंद्राला अटक करण्याची तयारी फेब्रुवारी महिन्यातच केली होती. परंतु सचिन वाझे याच्यामुळे राज कुंद्राला अटक होण्यास वेळ लागला आणि ही अटक लांबली. यादरम्यान उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या एँटेलिया घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली होती. यानंतर संपूर्ण यंत्रणेचे लक्ष या प्रकरणात गुंतले.

म्हणून कुंद्राला अटक करण्यासाठी ५ महिने लागले

मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली झाल्यानंतर हेमंत नगराळे यांना आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली. नव्या आयुक्तांच्या येण्यानंतर त्यांनी क्राईम ब्रांचमधून कित्येक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यात. यामध्ये राज कुंद्रा प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याची देखील बदली झाली. मुंबई पोलीस दलात झालेल्या बदलामुळे पुरावे असूनही राज कुंद्राच्या अटकेसाठी ५ महिन्याचा काळ लागला. राज कुंद्राला पॉर्न फिल्म बनवण्याच्या आरोपाखाली कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर त्याला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. क्राईम ब्रान्चच्या पथकाने मंगळवारी राज कुंद्राला भायखळा जेलमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती मिळतेय.

४ फेब्रुवारी रोजी पहिली तक्रार दाखल

- Advertisement -

या प्रकरणासंदर्भात राज कुंद्राची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. मात्र तो अद्याप अनेक प्रश्नांना उत्तरं देत नसल्याचे सांगितले जात आहे. भायखळा जेलमध्ये राज कुंद्राची चौकशी सुरू आहे. ४ फेब्रुवारी रोजी या प्रकरणात पहिल्यांदा तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांना त्याची कारवाई लांबणीवर का गेली? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

- Advertisement -