Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीची पहिली रिअ‍ॅक्शन; म्हणाली...

राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीची पहिली रिअ‍ॅक्शन; म्हणाली…

Related Story

- Advertisement -

बॉलीवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीने पहिल्यांदाच व्यक्त झाली आहे. शिल्पा शेट्टीने पहिल्यांदाच यासंदर्भात मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे. सतत शिल्पा सोशल मिडियावरवर अ‍ॅक्टिव्ह असणाऱ्या शिल्पाने यासाठी सोशल मिडियाचा आधार घेतल्याचे समोर आले आहे. तिच्या पतीच्या अटकेनंतर ती स्वतः सोशल मीडियापासून लांब असल्याचे दिसले होते. गुरूवारी रात्री शिल्पा शेट्टीने इंस्टाग्राम स्टोरीवर एका पुस्तकातील पानाचा फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये असे लिहिले आहे, “रागात मागे पाहू नका अथवा भीतीने समोर पाहू नका, त्याऐवजी जागरूकतेनं पाहा.”

अशी आहे शिल्पाची पोस्ट

“आपण रागात, ज्या लोकांनी आपल्याला दुखावले आहे, जी निराशा आपण अनुभवली आहे, जे दुर्दैव आपण सहन केले आहे, यांकडे मागे वळून पाहतो. आपण अशा शक्यतांना घाबरतो, की आपली नोकरी जाऊ शकते, आजार होऊ शकतो किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. आपल्याला ज्या ठिकाणी राहण्याची गरज आहे, ते हेच आहे. आता – काय झाले आहे किंवा काय होऊ शकते याकडे चिंताग्रस्त होऊन पाहू नका, पण काय आहे याची जाणीव असू द्या.”, असे शिल्पाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ETimes (@etimes)

- Advertisement -

स्वतःच्या पतीच्या अटकेनंतर शिल्पाने स्वतःला कशाप्रकारे सांभाळले आहे हे या पोस्टवरून दिसून येते पुढे या पोस्टमध्ये असे म्हटले की, “मी जिवंत राहण्यासाठी भाग्यशाली आहे, हे जाणून, मी दीर्घ श्वास घेतो. मी भूतकाळात आव्हानांचा सामना केला आहे आणि भविष्यातही मी आव्हानांचा सामना करू शकतो. आज मला माझे जीवन जगण्यापासून विचलित करण्याची आहीही आवश्यकता नाही.”

- Advertisement -

दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती, उद्योगपती राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली असून पॉर्नोग्राफिक चित्रपट चित्रीकरण आणि ते विविध अ‍ॅप्सच्या माध्यमातून प्रदर्शित करण्याचा आरोप राज कुंद्रावर आहे. मात्र आता राज कुंद्रा यांच्या वकिलाने कुंद्रा यांना ज्या अश्लील चित्रपटांच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली ते चित्रपट पॉर्नोग्राफी प्रकारामध्ये मोडत असल्याचा युक्तीवाद केला आहे. हा युक्तीवाद राज कुंद्रा यांचे वकील आबाद पोंडा यांनी गुरूवारी न्यायालयासमोर केले. यावेळी सोमवारी मुंबई पोलिसांनी केलेल्या अटकेच्या कारवाईवर देखील त्यांनी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

गेल्या काही महिन्यांपूर्वी मुंबई पोलिसांनी अश्लील चित्रपट अर्थात पॉर्नची निर्मिती करून अ‍ॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केल्याचे समोर आले होते. या प्रकरणामध्ये कुंद्रा मुख्य आरोपी असल्याचा दावा पोलिसांनी या कारवाईचं समर्थन करताना केला होता. त्यावर राज कुंद्रा यांनी पोंडा यांच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली. आपण निर्माण केलेल्या कंटेटला कायदेशीर भाषेत पॉर्न म्हणता येणार नाही. हा कंटेट अश्लील प्रकारामध्ये मोडतो असा युक्तीवाद कुंद्रांच्या वकिलांनी केल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -