Eco friendly bappa Competition
घर मुंबई शिंदे सरकारने आरे कारशेडवरची स्थगिती उठविली; आरे वाचविण्यासाठी देशभरात पर्यावरण प्रेमींचे आंदोलन

शिंदे सरकारने आरे कारशेडवरची स्थगिती उठविली; आरे वाचविण्यासाठी देशभरात पर्यावरण प्रेमींचे आंदोलन

Subscribe

राज्यसरकारने आरे मेट्रो कारशेड संदर्भात स्पष्टीकरण दिल्यांनतर आणि कामावरील स्थगिती उठवल्यानंतर पर्यावरण प्रेमी मात्र आक्रमक झाले आहेत. आरे वाचावा मोहिमेसाठी आज देशभरात आंदोलन होणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(cm eknath shinde) यांनी आरेतील मुंबई मेट्रो कारशेडवरची असलेली स्थगिती उठवली आहे. बंडखोरी नंतर उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का देत पुन्हा आरेमध्ये कारशेड(aaray carshed0 करण्याचा निर्णय घेतला आहे. काही तांत्रिक बाबींची पूर्तता झाली आणि आरे कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. कारशेडचा मार्ग मोकळा झाला असला तरी या कारशेडला पर्यावरण प्रेमींकडून मोठ्या प्रमाणात विरोध दर्शविण्यात येत आहे. आरेतच मेट्रो कारशेड तयार होणार असं आता राज्यसरकारने स्पष्ट केलं आहे. राज्यसरकारने आरे मेट्रो कारशेड संदर्भात स्पष्टीकरण दिल्यांनतर आणि कामावरील स्थगिती उठवल्यानंतर पर्यावरण प्रेमी मात्र आक्रमक झाले आहेत. आरे वाचावा मोहिमेसाठी आज देशभरात आंदोलन होणार आहे.

हे ही वाचा – आरेतील कारशेडला सुमीत राघवनचा पाठिंबा; पर्यावरणप्रेमींकडून तीव्र संताप

- Advertisement -

आरे मेट्रो कारशेड कामावरची स्थिगिती हटविण्याच्या निर्णयानंतर पर्यावरण प्रेमीही आक्रमक झाले आहेत. मुंबई(mumbai), नागपूर, वाराणसी आणि हैदराबाद यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये आंदोलन होणार आहे. त्याचबरोबर मुंबईतील आरे परिसरातही आंदोलन करण्यात येणार आहे. मेट्रो कारशेडचा(metro carshed) हा वाद बऱ्यच काळापासून सुरु आहे. हा वाद न्यायालयात सुद्धा पोहोचला होता. त्यांनतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि शिंदे – फडणवीस सरकार येताच आरे मध्ये पुन्हा कारशेड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरे कारशेडवरची स्थगिती अधिकृतपणे उठविण्यात आली आहे.

shinde - fadanvis

- Advertisement -

हे ही वाचा –  मेट्रो ३ कारशेडसाठी कांजूरमधील एक अडथळा दूर, उच्च न्यायालयाकडून ‘तो’ आदेश रद्द

आरेमध्ये कोण, किती जागा वापरत आहे?

– कोकण कृषी विद्यापीठ १४५. ८० एकर जागा
– मॉर्डन बेकरी १८ एकर
– फिल्म सिटी ३२९ एकर
– महानंद डेअरी २७ एकर
– वॉटर कॉम्प्लेक्स (पवई) ६५ एकर

अरे मधील एकूण झाडांची संख्या ४.८ लाख आहे आणि आरे मध्ये होणारी वृक्षतोड ही २१८५ मेट्रो ३ साठी आवश्यक जागा – ३० हे हेक्टर पुनर्रोपण करण्यात येणार्‍या झाडांची संख्या- 461 पुनर्रोपण करण्यात आलेली झाडे -1045 नव्याने लावण्यात येणार असलेली झाडे – 13 हजार आरेमध्ये आतापर्यंत झालेले जमीनीचे अधिग्रहण – 333.50 हेक्टर आरे कॉलनीची एकूण जागा – 1281 हेक्टर आरे कॉलनीतील विदेशी झाडांचे प्रमाण – 40 टक्के आहे.

हे ही वाचा – आरे कारशेडसाठी नव्याने वृक्ष कत्तलींची गरज नाही, फडणवीसांचा दावा

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -