घरCORONA UPDATE‘कोरोना’साठी आशा पारेख रुग्णालय ताब्यात घ्या, शिवसेनेची मागणी!

‘कोरोना’साठी आशा पारेख रुग्णालय ताब्यात घ्या, शिवसेनेची मागणी!

Subscribe

सांताक्रुझ पश्चिम येथील आशा पारेख रुग्णालय हे बंद स्थितीत असून ही वास्तू महापालिका व सराकरने उपयोगात आणावी अशी सुचना जानावळे यांनी केली आहे.

मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे करोनाग्रस्तांवर उपचार करता यावे तसेच त्यांच्या निकटच्या संपर्कात आलेल्यांना ‘क्वारंटाईन’मध्ये ठेवता यावे,  यासाठी महापालिकेच्यावतीने जागेचा शोध सुरु आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या करोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी सांताक्रुझ पश्चिम येथील आशा पारेख रुग्णालय ताब्यात घेण्याची मागणी शिवसेनेकडून होत आहे. या रुग्णालयात सर्वप्रकारच्या पायाभूत सुविधा असल्यामुळे महापालिकेला त्याठिकाणी कोरोनाग्रस्तांसाठी वॉर्ड उभारण्यास जास्त मेहनत तसेच पैसेही खर्च होणार नाही. या रुग्णालयाची जागा ताब्यात घेण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मेलद्वारे निवेदन पाठवले आहे.

कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करताना डॉक्टर तसेच नर्सेससह रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही महत्वाची असून त्यांना याबाबतचे योग्य प्रशिक्षण न दिल्यास करोना विषाणूचा संसर्ग अधिक होण्याची भीती आहे. त्यामुळे हा संसर्ग न रोखल्यास पुढील काही दिवसांमध्ये इटली, अमेरीका आदी राष्ट्रांसारखी परिस्थिती मुंबईत निर्माण होऊ शकते, अशी भीती व्यक्त करत मुंबईत बंद असलेली रुग्णालये कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्याची मागणी शिवसेनेचे सांताक्रुझमधील पदाधिकारी जितेंद्र जानावळे यांनी केली.

- Advertisement -

सांताक्रुझ पश्चिम येथील आशा पारेख रुग्णालय हे बंद स्थितीत असून ही वास्तू महापालिका व सराकरने उपयोगात आणावी अशी सुचना जानावळे यांनी केली आहे. जर आपण रेल्वे डब्बे आयसोलेट करून त्याचा उपयोग करण्याच प्रयत्न करत आहोत तर मग अशाप्रकारची सर्व प्रकारची पायाभूत सुविधा उपलब्ध असलेल्या आशा पारेख रुग्णालयाचा वापर का करत नाही, असाही सवाल त्यांनी केला आहे. त्यामुळे हे रुग्णालय सरकारने तथा महापालिकेने ताब्यात घेवून मुख्यमंत्री सहायता निधीतून प्राप्त झालेल्या मदतीतून या हे रुग्णालय सुसज्ज करावे आणि याठिकाणी सर्व स्टाफला सुरक्षा किट उपलब्ध करून देत त्याचा वापर करावा, अशी सूचना त्यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -