Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी ठाण्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक

ठाण्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक

Subscribe

'या स्मारकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणी विविध माध्यमातून जपल्या गेल्या आहेत. हे स्मारक भावी पिढीला प्रेरणादायी तर आहेच शिवाय बाळासाहेबांच्या कलाप्रेमी कर्तृत्वाला साजेसे असल्याची प्रतिक्रिया' काही नामवंत लेखक, कलावंतांनी या स्मारकाची पाहणी करताना दिली.

ठाण्यातील तीन हात नाका परिसरात भव्यदिव्य असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे‍ लक्षवेधक स्मारक महापौर नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून ठाणे महापालिकेच्या माध्यमातून साकारण्यात आले आहे. ‘या स्मारकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणी विविध माध्यमातून जपल्या गेल्या आहेत. हे स्मारक भावी पिढीला प्रेरणादायी तर आहेच शिवाय बाळासाहेबांच्या कलाप्रेमी कर्तृत्वाला साजेसे असल्याची प्रतिक्रिया’ काही नामवंत लेखक, कलावंतांनी या स्मारकाची पाहणी करताना दिली. महापौर नरेश म्हस्के यांच्यासमवेत संगीतकार कौशल इनामदार, अभिनेते सुबोध भावे, लेखक आणि दिग्दर्शक अभिराम भडकमकर, रवि जाधव यांनी नुकतेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाला भेट दिली आहे.

स्मारकाला कलाकारांची भेट

या संपुर्ण स्मारकाची पाहणी केली असता, बाळासाहेबांच्या जीवनातील सर्व महत्वपूर्ण घटकांचा बारकाईने विचार करुन त्या योग्य पध्दतीने मांडल्या आहेत. ‘या स्मारकाला भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बाळासाहेबांच्या अस्तित्वाची जाणीव झाल्या शिवाय राहणार नाही’, असे संगीतकार कौशल इनामदार यांनी म्हटले आहे. तसेच ‘बाळासाहेबांचे चरित्र या स्मारकामधून उलगडत असून ते थेट हृदयास भिडते आणि यातून तरूणांना प्रेरणा मिळते’, असे मत अभिनेते सुबोध भावे यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

स्मारकात ‍ विविध कार्यक्रम आयोजित करणार

या स्मारकाची पाहणी करत असताना, शिवसेनाप्रमुख हे व्यंगचित्रकार होते त्यामुळे नव्या ‍पिढीला निश्चीतच हे स्मारक प्रेरणादायी ठरणार असल्याचा विश्वास लेखक दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांनी व्यक्त केला. ‘बाळासाहेबांची कलेवर असीम निष्ठा होती. कलेचा व कलाकारांचा त्यांनी नेहमीच सन्मान केला आहे, त्यामुळे या स्मारकात ‍ विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावे’, असे मत स्मारकाची पाहणी करताना दिग्दर्शक रवी जाधव यांनी व्यक्त केले.

ठाणेकरांची स्मारकाला भेट देण्यासाठी गर्दी

- Advertisement -

6 फेब्रुवारीला या स्मारकाचे लोकार्पण मुख्यमंत्री उदध्व ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले, लोकार्पणानंतर या स्मारकास दररोज ठाणेकर भेट देत आहेत. त्यानंतर असंख्य कलाप्रेमी एकत्र येऊन अनेक विविध कार्यक्रम देखील सादर करीत आहे. यावेळी संगीतकार कौशल इनामदार, दिग्दर्शक रवी जाधव तसेच अभिनेते सुबोध भावेंनी या स्मारकाला भेट दिल्यावर आपली कला सादर करण्याची इच्छा व्यक्त केली असून लवकरच या कलावंतांची कला ठाणेकरांना पाहायला मिळेल असेही महापौरांनी यावेळी नमूद केले आहे. त्यामुळे आता ठाणे हे कलावंतांचे शहर म्हणून देखील नावारुपास येत आहे. ‘या कलावंतांच्या इच्छा तसेच नवोदित कलावंतांना देखील कला सादर करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील’, असेही महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले.

- Advertisment -