घरताज्या घडामोडी'परळ ब्रँड'चा शिवसैनिक हरपला, माजी खासदार मोहन रावले यांचे निधन

‘परळ ब्रँड’चा शिवसैनिक हरपला, माजी खासदार मोहन रावले यांचे निधन

Subscribe

शिवसेना नेते, माजी खासदार मोहन रावले यांचे हृद्यविकाराने निधन.

शिवसेना नेते, माजी खासदार मोहन रावले यांचे निधन झालं आहे. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृद्यविकाराने त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. मोहन रावले हे शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळातील एक शिलेदार म्हणून ओळखले जाणारे सर्वसामान्याचे नेते होते. परळ ब्रँड अशी ओळख असलेल्या मोहन रावले यांचे गोव्यात निधन झाले आहे. दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ते पाच वेळा लोकसभेवर निवडून आले होते. विशेष म्हणजे मुंबईतील परळ-लालबाग भागातील अत्यंत लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जायचे.

मोहन रावले यांच्याविषयी

‘शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले गोव्यात काही कामानिमित्त गेले होते. त्यावेळी त्यांचं निधन झालंय. मोहन रावले यांचे पार्थिव मुंबईत अंत्यविधीसाठी आज संध्याकाळी आणलं जाणार आहे. दादर मधील त्यांच्या घरी पार्थिव आणल्यानंतर त्यांची कर्मभूमी असलेल्या परळ शिवसेना शाखेत त्यांचे पार्थिव शिवसैनिकांना अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मोहन रावले हे पहिल्या फळीचे शिवसैनिक होते. तसेच भारतीय विद्यार्थी सेनेचे पहिले अध्यक्ष होते.’

- Advertisement -

कडवट शिवसैनिक…दिलदार दोस्त

मोहन रावले गेले. कडवट शिवसैनिक..दिलदार दोस्त. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात रक्त सांडलेले मोहन रावले अचानक सोडून जातील असे वाटले नव्ह्ते. ‘परळ ब्रँड’ शिवसैनिक हीच त्याची ओळख. मोहन पाच वेळा खासदार झाला. पण, अखेरपर्यंत तो सगळ्यांसाठी मोहनच राहीला विनम्र श्रद्धांजली…

- Advertisement -

हेही वाचा – रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -