घरठाणेशिवसेनेच्या बालेकिल्ल्यात ‘भावी मुख्यमंत्र्यां’चे बॅनर?

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात ‘भावी मुख्यमंत्र्यां’चे बॅनर?

Subscribe

राजकीय चर्चांना उधाण, तासाभरातच चढला पांढरा रंग

शिवसेना-भाजप युतीला 2019 मधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये जनतेचा कौल मिळूनही युतीचे सरकार सत्तेत येऊ शकले नाही, ते सत्तावाटपाच्या बिघडलेल्या ५०-५० सुत्रामुळे. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावर हक्क सांगितल्याने युतीत काडीमोड झाल्याचे म्हटले जाते. त्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. सोबतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावर विराजमान होत बाळासाहेबांना दिलेले वचन देखील पूर्ण केले.

त्याआधी शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण? या चर्चांमध्ये कधी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे तर कधी अन्य नेत्यांची नावे नेहमीच चर्चेत असायची. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या आजारपणात भाजपकडून हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला जाऊ लागला. या मुद्याकडे शिवसेनेकडून नेहमीच दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, सोमवारी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरात लावण्यात आलेल्या बॅनरवर ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या. शहरात याची चर्चा रंगू लागताच ताबडतोब हे बॅनर झाकण्यात आले.

- Advertisement -

शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरात लावण्यात आलेल्या बॅनरवर ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून शिंदे यांचा उल्लेख करण्यात आला होता. तदपूर्वी म्हणजे सत्ता स्थापना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणात शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून पुढे आले होते. त्यामुळे ठाण्यात लावलेल्या बॅनरमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले. ही बातमी वार्‍यासारखी पसरल्यावर सायंकाळी शिवसैनिकांकडून त्या बॅनरवरील ‘भावी मुख्यमंत्री’ या उल्लेखावर पांढरा रंग मारण्यात आला.

पालकमंत्री शिंदे यांचा येत्या 9 फेब्रुवारीला वाढदिवस आहे. त्यानिमित्त ठाणेनगरी प्रत्येक चौकाचौकात आणि नाक्यानाक्यांवर बॅनर लावण्यात आले आहेत. त्यातील एक ठाण्यातील वागळे इस्टेटमधील चेकनाका येथे लावण्यात आलेल्या बॅनरवर एकनाथ शिंदे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला होता. हे बॅनर लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष विजय यादव यांनी लावले आहे. हे वृत्त कळताच शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसैनिकांनी ‘भावी मुख्यमंत्री’ या उल्लेखावर पांढरा रंग मारत चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -