तो गट नव्हे तर गटार, संजय राऊतांची शिंदे गटावर टीका

sanjay raut
शिवसेना खासदार संजय राऊत

आज शिवसेनेचे बंडखोर नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी संजय राऊतांचा सकाळचा मॅटनी शो बंद झाला आहे, अशी टीका केली होती. एकनाथ शिंदेंच्या टिकेला शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. यावेळी त्यांना शिंदे गटाविषयी प्रश्न विचारला असाता त्यांनी त्या गटाचा प्रश्न संपला हो. कसले तुम्ही गट गट करताय. गट नाही तो गटार आहे ते, अशी टीका संजय राऊत यांनी शिंदे गटावर केली.

2024 मध्ये मॅटनी शो आणि सिनेमा आमचाच असेल –

युतीचा शंब्द पाळला असता तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले असते. भाजपने युतीच्या पाठीत खंजीर खुपल्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत आणि पुढची व्यावस्था करावी लागली. एकनाथ शिंदे यांची फसवणूक भाजपने केली. आज तुमच्याकडे आकडा आहे ना, तर तो आकडा लावा. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी शोले आणि दिवार मॅटनी शोमध्येच 25 वर्ष चालले. मराठी सिनेमा मॅटनी शोमध्ये चालतो. 2024 मध्ये मॅटनी शो आणि सिनेमा आमचाच असेल, असा टोला बंडखोर शिंदे गटाचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

त्या गटाचा विषय संपला हो-

यावेळी त्यांना शिंदे गटाविषयी प्रश्न विचारला असाता त्यांनी त्या गटाचा प्रश्न संपला हो. कसले तुम्ही गट गट करताय. गट नाही तो गटार आहे ते, अशी टीका त्यांनी शिंदे गटावर केली.

रामदास कदम यांच्यावर टीका –

रामदास कदम आणि आम्हा सगळ्यांना पक्षानं खूप दिलं. मलाही काही मिळालं नसेल पण मी मनात ठेवलं. मला कधीही मंत्रिपद मिळालं नाही. त्यांना अनेक मंत्रिपदं मिळाली. शिवसेना आमची आई आहे आणि त्या आईचं दूध पिऊनच आम्ही मोठे झालो. त्याचबरोबर संजय राऊत म्हणाले की, माझ्यावर किंवा विनायक राऊत यांच्यावर कोणताही प्रश्न उपस्थित करणं मुळातच चुकीचं आहे. प्रलोभनं आणि दबाव आमच्यावरही आहे. प्रलोभनावर आम्ही कुत्र्यासारखी टांग वर करुन दाखवतो आणि दबावाला आम्ही झुगारून लावतो. वाईट काळात आम्ही पक्षासोबत आहोत, आमची निष्ठा पक्षासोबत आहे, असे संजय राऊत म्हणाले.