Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी ...आणि संजय राठोड प्रश्नावर सुभाष देसाईंचा हात जोडत काढता पाय

…आणि संजय राठोड प्रश्नावर सुभाष देसाईंचा हात जोडत काढता पाय

Related Story

- Advertisement -

टीकटॉकस्टार पूजा चव्हाण आत्महत्येसंदर्भात रोज नवीन खुलासे होत असून शिवसेना नेते व वनमंत्री संजय राठोड यांचा या प्रकरणाशी थेट संबंध असल्याची शक्यताही वाढत आहे. याचपार्श्वभूमीवर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांना आज पत्रकारांनी संजय राठोड यांच्याबद्दल  प्रश्न विचारला असता हात जोडत काहीही न बोलता त्यांनी तेथून काढता पाय घेतला. (Shivsena Subhash Desai No Comment On Sanjay Rathod Case)

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला १७ दिवसांहूनही अधिक दिवस झाले आहेत. याप्रकरणाचा संबंध राठोड यांच्याशी असल्याच्या ऑडिओ क्लिपही व फोटो व्हायरल झाले. पण पोलिसांनी या प्रकऱणी अजून कोणावरही कारवाई केली नाही. यामुळे विरोधक आक्रमक झाले असून संजय राठोडांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबरोबरच त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत. यामुळे ठाकरे सरकारवर दबाव वाढत असून संजय राठोड प्रकरणावर मौन बाळगण्याचे आदेशच नेत्यांना देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -