घरताज्या घडामोडीकंगनाच्या ट्विटमुळे बदनामी झाल्याने सरनाईकांकडून हक्कभंगाची नोटीस

कंगनाच्या ट्विटमुळे बदनामी झाल्याने सरनाईकांकडून हक्कभंगाची नोटीस

Subscribe

रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यानंतर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत विरोधात हक्कभंगाची नोटीस दिली आहे. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे प्रताप सरनाईक यांनी हक्कभंगाची नोटीस सादर करणार असल्याची माहिती दिली होती. पाकिस्तानचे क्रेडिट कार्ड सरनाईक यांच्या घरी सापडल्याचे ट्विट कंगनाने केले होते. पण आज सरनाईक यांनी हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना कंगनाचा हा दावा फेटाळून लावला. पण कंगनाच्या ट्विटमुळे कुटुंबियांची बदनामी झाल्याने ही हक्कभंगाची नोटीस दिल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. खोट्या माहितीवर ट्विट करणारी कंगना आणि खोट्या बातमी देणाऱ्यांविरोधात हक्कभंगाची नोटीस दाखल करण्याची मागणी प्रताप सरनाईक यांनी केली आहे. तसेच ईडी चौकशीमध्ये सर्वतोपरी सहकार्य करू अशी सरनाईक यांनी ग्वाही दिली आहे.

काय म्हणाले प्रताप सरनाईक?

‘प्रताप सरनाईकच्या घरी पाकिस्तानी क्रेडिट कार्ट मिळाले. प्रताप सरनाईकच्या घरी राफेलचे कागदपत्र मिळाले. प्रताप सरनाईकच्या घरी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत पार्टनरशिप असलेले कागदपत्र मिळाले, अशा प्रकारच्या खोट्या बातम्या प्रसारित करून माझी आणि माझ्या कुटुंबियांची बदनामी केली जात आहे. त्यामुळे कंगनाच्या विरोधात हक्कभंगाची नोटीस दाखल केली आहे. भविष्यात अजूनही खूप बातम्या मिळतील. काहींना काही बातम्या देऊन माझी बदनामी करण्याचे हे कटकारस्थान आहे. त्यामुळे या हक्कभंगाच्या नोटीसला ताबडतोब मंजूरी द्यावी, अशी मी आज विनंती केली आहे,’ असे प्रताप सरनाईक माध्यमांशी बोलताना म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – युती तुटल्यानंतरही मोजके लोक मातोश्रीवर यायचे, त्यापैकी एक सरदार तारासिंह – मुख्यमंत्री


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -