घरठाणेप्रताप सरनाईकांशी संबंधित व्यावसायिक योगेश देशमुख यांना जामीन

प्रताप सरनाईकांशी संबंधित व्यावसायिक योगेश देशमुख यांना जामीन

Subscribe

देशमुख यांना ईडीने एप्रिल महिन्यात अटक केली होती.

ठाण्यातील व्यावसायिक, तसेच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या योगेश देशमुख यांना जमीन मंजूर झाला आहे. पीएमएलए विशेष न्यायालयाने गुरुवारी देशमुख यांचा जामीन मंजूर केला असून तीन लाख रुपयांच्या जामिनावर त्यांना सोडण्यात आले आहे. न्यायालयाने जामीन आदेशावर काही अटी देशमुख यांना घातल्या आहेत. देशमुख यांना ईडीने एप्रिल महिन्यात मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्यांना पाच महिन्यांनी आता जामीन मंजूर करण्यात आला आहे.

एक प्रथितयश बिल्डर अशी योगेश देशमुख यांची ओळख आहे. त्यांचे प्रताप सरनाईक यांच्याशी आर्थिक संबंध होते. तसेच टिटवाळा नजीक गुरवली येथील ७८ एकर जागा देखील प्रताप सरनाईक यांनी देशमुख यांच्याकडून खरेदी केल्याचे पुरावे ईडीला चौकशीत मिळाल्याचे सांगण्यात येते. १६ मार्चला योगेश देशमुख यांच्या कल्याण गोदरेज हिल येथील बंगल्यावर ईडीच्या पथकाने रेड केली होती. त्यावेळी देशमुख घरात होते, पण या कारवाईने ते अस्वस्थ झाले आणि नंतर त्यांना कोविडचे निदान झाले. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले होते. या रेडच्या वेळी योगेश देशमुख यांची पत्नी शीतल यांचा ईडीच्या अधिकाऱ्यांशी वादही झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -