भाजपने तिसरी जागा लढवली तरी फरक पडत नाही – संजय राऊत

भाजपचे (bjp) राज्यसभेवर दोन उमेदवार निवडून जातील. पण भाजपने तिसरा उमेदवारही उभा करण्याचे सुतोवाच दिले आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमीच दिसते. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला आव्हानच दिले आहे.

Sanjay Raut
राज्यसभेच्या ( Rajya Sabh) ६ व्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती ( Sambhaji Raje Chhatrapati) यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मात्र, शिवसेनेच्या ( Shiv Sena) दोन उमेदवारी अर्ज भरल्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ठ झाले आहे. तर संभाजीराजे या निवडणुकीतून माघार घेणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) आणि शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) यांनी गुरूवारी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला. 
विजय आमचाच
भाजपचे (bjp) राज्यसभेवर दोन उमेदवार निवडून जातील. पण भाजपने तिसरा उमेदवारही उभा करण्याचे सुतोवाच दिले आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमीच दिसते. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला आव्हानच दिले आहे. अर्ज दाखल केल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. भाजपने तिसरी जागा लढवली तरी फरक पडत नाही. भाजपाने तिसरा, चौथा, पाचवा उमेदवार द्यावा. आम्ही आमच्या जागा निवडून आणू. शिवसेनेच्या उमेदवारांना  महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे. त्यांनी कितीही प्रयत्न करू द्या. विजय आमचाच होणार, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे
महाविकास आघाडीचे ४ उमेदवार विजयी
संजय राऊत म्हणाले, मी आणि संजय पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सेनेचे दोन्ही उमेदवार राज्यसभेत जातील हे मी खात्रीने सांगतो. राष्ट्रवादीचे प्रफुल्ल भाई पटेल हे ३१ तारखेला अर्ज भरतील. काँग्रेसचा उमेदवार ठरल्यावर ते अर्ज भरतील. महाविकास आघाडी एकत्र आहे. त्यामुळे राज्यसभेच्या सहा जागांपैकी महाविकास आघाडीचे ४ उमेदवार नक्कीच विजयी होतील.
भाजपाकडून दबावतंत्र
मंत्री अनिल परब यांच्यावरील ईडीच्या कारवाईबद्दल राऊत म्हणाले की, या कारवाया सूडबुद्धीने होत आहेत. भाजपाकडून दबावतंत्र सुरू आहे. मात्र, शिवसेना आणि महाविकास आघाडी दबावाला भीक घालत नाही. अशा कारवाया करुन निवडणुका जिंकू असे त्यांना वाटत असेल तर त्यांनी नक्की कारवाया कराव्यात. सध्याचा काळही एक दिवस निघून जाईल. नंतर सूत्रे आमच्या हातात येतील.