शिवसेनेचे ठरले, संजय राऊत भरणार ‘या दिवशी’ राज्यसभेसाठी अर्ज

MP Sanjay Raut criticized the Agneepath scheme

राज्यसभेच्या (Rajya Sabha) निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्यसभेसाठी 10 जूनला मतदान होणार असून सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. शिवसेनेने (Shiv Sena) हालचाली सुरु केल्या आहेत. या निडणुकीसाठी शिवसेनेचे नते संजय राऊत (MP Sanjay Raut) 26 मे रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

असे आहे मताचे गणित –

राज्यातील बदललेल्या राजकीय स्थितीनुसार भाजपचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी होईल. तर, सहाव्या जागेसाठी आवश्यक असणारे संख्याबळ राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडे असून शिवसेनेने सहाव्या जागेवर दावा केला आहे. शिवसेनेने (Shiv Sena) पहिल्या जागेसाठी संजय राऊत (MP Sanjay Raut) यांचे नाव निश्चित केले आहे.

हेही वाचा – राज्यसभेसाठी शरद पवारांचा संभाजी राजेंना पाठिंबा

सहाव्या जागेसाठी माजी खासदारांची नावे चर्चेत –

राज्यसभेसाठी (Rajya Sabha) भाजपचे पियूष गोयल, विनय सहस्त्रबुद्धे आणि विकास महात्मे तर शिवसेनेचे संजय राऊत (MP Sanjay Raut), राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे पी. चिदंबरम असे महाराष्ट्रातील राज्यसभा सदस्य 4 चुलैला निवृत होत आहेत. या रिक्त जागांसाठी निडणूक लागली आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून 4 री माजी खासदारांची नावे चर्चेत आहेत. यात चंद्रकांत खैरे, शिवाजी आढळराव पाटील, अनंत गीते आणि आनंदराव अडसूळ यांचा समावेश आहे. हे चारही नेते गेल्या लोकसभी निवडणुकीत पराभूत झाले आहेत. यातील एका माजी खासदाराला राज्यसभेसाठी संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा – शिवसेनेच्या ऑफरनंतरही संभाजीराजे अपक्ष उमेदवारीवर ठाम?

संभाजी राजेंची घोषणा –

छत्रपती संभाजीराजेंनी राज्यसभा (Rajya Sabha) निवडणुक अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना निवडून येण्यासाठी 42 आमदारांच्या मताची आवश्यकता आहे. तर अर्ज दाखल करण्यासाठी 10 अनुमोदक आमदारांची आवश्यकता आहे. संभाजीराजेंनी यासाठी आपक्ष आमदारांना साद घातली आहे. त्यांनी राज्यातील पक्षांना त्यांच्याकडे संख्याबळ नसल्याने ही जागा आपल्याला अपक्ष म्हणून देण्याची मागणी केली आहे.