शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अनकट भाषण

Shiv Sena party chief, Chief Minister Uddhav Thackeray's speech
Shiv Sena party chief, Chief Minister Uddhav Thackeray's speech

जमलेल्या माझ्या तमाम हिंदु बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो…

तुमच्या प्रमाणे मला पण मोकळ अनेक दिवसांनी मैदानात. आज सर्व प्रथम छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. विषय बरेच आहेत. हल्ली विशेषत सर्वच पक्ष त्यातही खोटा हिंदुत्वाचा बुरखा घातलेला पक्ष. आमच हिंदुत्व देवळात घंटा बडवणारा नाही अतिरेक्यांनी बडवणारा. आमच हिंदुत्व गदाधारी. आमच हिंदुत्व गधादारी होत त्याला सोडून अडीच वर्ष झाली. कालचा गोधळ बरा होता. गाढवाने लाथ मारायचा आधी आम्हीच लाथ घातली.

आज एक भ्रम निर्माण केल्या जातो की हिंदुत्वाचे रक्षक भाजपच. इथे जमलेला हिंदु हा मेल्या आईचे दूध प्यालेला नाही.
१ मे रोजी भाजपची सभा ते म्हणाले आम्ही मुंबई स्वतंत्र करणार, जे पोटात तेच ओठावर आले, अरे तुमच्या साठ पिढ्या आल्या तरी जमणार नाही. हौतात्म्य पत्करून मुंबई मिळवलेली आहे. देशातली पहिली बुलेट ट्रेन आपण मागितलेली नाही हा मुंबई तोडण्याचा डाव. संघाला दोन चार वर्षात १०० वर्ष होतील. मग स्वातंत्र्य लढ्यात संघ कुठेच नव्हता, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जनसंघ होता. ठाकरे कुटुंब या लढ्यात. संयुक्त महाराष्ट्र समितीने सर्वांना एकवटले मात्र यातून सर्वप्रथम जनसंघ बाहेर पडला कशावरून जागावाटपावरुन. तेव्हापासून मुंबईचा लचका तोडण्याचा हेतू यांचा. दुसरा महत्वाचा मुद्दा महागाई. हिंदुत्व श्वास मराठी प्राण. महागाई वर कोणी बोलत नाही. कोविड बैठकीत मा. पंतप्रधान समारोप करतांना कोविड वर उपाय काय तर पेट्रोल डीझेलचे दर कमी करा असे म्हणतायत असे वाटले. मुंबई ओरबडण्यासाठी तुम्हाला हवी आहे आम्ही सर्व संकटात मदतीला शिवसैनिक उडी मारतो.

आमची युतीत २५ वर्षे सडली. आज विश्वास बसत नाही. किती वाईट पणाने समोर येतय. सामनात जे येत ते देशाच्या हिताचे. सामनाचा एक लेख दाखवा ज्या पद्धतीने तुम्ही आमच्यावर टीका करायहेत. वाजपेयी पेट्रोल दरवाढ झाल्यावर बैलगाडीतून संसदेत तो संवेदनशील भाजप कुठे आहे? म्हाळगी प्रबोधिनीत यांचे चिंतन तेव्हा जावस वाटायचं. मग आता प्रश्न पडतो तिथे तुम्ही हे शिकवता का? ते शिकेलेले कुठे गेले? आता कोण आहे तिथे? आपण खोट बोलण्यात कमी पडतो तो भाजपच्या हिंदुत्वात बसतो.

राहुल भटला जिथे मारले तिथे काय हनुमान चालिसा म्हणायचे? हे काशमीर फाईलगसचे पुढचे पाऊल आहे काय? आता उज्वला योजना सिलेंडर हजार रूपये. लाज लज्जा नाही केवळ लोकांना भ्रमिष्ट करायचे हे हिंदुत्व.

संभाजीनगरच आहे. यांची ए टीम बी टीम सी टीम कोणाच्या हाती काही तरी द्यायचे. टाॅमेटाओ साॅस लाऊन पत्रकार परिषद घ्यायच्या. राहुल भटला पंडितांना सुरक्षा नाही पण इथे टिनपाटांना सुरक्षा. या पध्दतीने यांचा कारभार. आमच हिंदुत्व ठरवणारे तुम्ही कोण? आमच हिंदुत्व तकलादू नाही. हिंदुत्व काय धोतर आहे? आम्ही उघडपणे गेलो सकाळचा शपथविधी नाही केला. तो प्रयत्न झाला असता तर मालिक देशमुख मांडीला मांडी लावून बसला असता.

राष्ट्रपती निवडणुकीत ३०-३२ लोक एनडीएचे सहकारी किती लोक हिंदुत्वादी होते. गेल्या आठवड्यात नितिश बोलले भोंग्यात पाणी. तुमची हिम्मत आहे बोलायची. काश्मीरात मुफ्ती मोहम्मद काय वंदेमातरम बोलयचे. पाकिस्तानने आव्हान दिले म्हणून सरकार स्थापन केले. मुफ्तीने पाकिस्तान हुरयत ला धन्यवाद देतो. फडणवीस बाबरी पडली तेव्हा तुमच वय बोलता किती आमच्यावर शंका उपस्थित करता मग देवेंद्रजी तुम्ही हिंदुत्वासाठी काय केले. तुम्ही चढला असता तर बाबरी तशीच खाली आली असती. मी साक्ष आहे अडवाणी म्हणतात ती जी लोक आहेरलत ती मराठी होती प्रमोदला पाठवले त्यांचे पण ऐकले नाही मग असे कोण असतील. मी साहेबांना सांगितले बाबरी पाडली. तेवढ्यात पॊन वाजला म्हणाले मला त्याचा अभिमान. मला म्हणाले हे असले नेते पुचाट, नेता जो जबाबदारी झटकतो तो नेता नाही. सुंदरसिंग भंडारी बोलले तेव्हा का बोलले नाहीत.

उत्तर द्यायची असतील तर महागाई वर द्या. ही केवळ गर्दी नाही हे सगळे वाघ आहेत. गेल्या वेळी त्यांनी भगव्या टोप्या घातल्या पण भगवे मेंदूत असते टोपीत असेल तर संघाची टोपी काळी का? तुमचे विकृत हिंदुत्व आहे शिवसेनाप्रमुखांनी विचार दिला तुम्ही त्याचा विकार केला. ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनीच केसाने गळा कापला. पवारांवर बाईंनी टीका केली, कुणी, कुणावर बोलायचे हेच का संस्कार? हे टाळल्या गेल्या पाहिजे.

मुंबईत जी कामे करतो आहे ते अभिमानी सांगता आली पाहीजे. आपण मनपात आठ भाषेत शिक्षण देतो. मनपाच्या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून रांग लागते. केजरिवालांना सांगू इच्छितो ही महापालिका आहे. आरोग्य व्यवस्था महाराष्ट्राने सदृढ केली. आज दाऊद बोलला मी भाजपात येतो तर त्याला पण मंत्री बनवतील. भानगडी करणारे हे स्वतः ला हनुमान पुत्र कसे म्हणवता. बाबरी झाल्यावर तुमची वीतभर नाही.. .मैलभर पळाली होती. कोरोनात ज्या थाळ्या वाजवल्या त्या भरण्याचे आमचे काम ह्दयात राम हाताला काम हे आपले हिंदुत्व. संपूर्ण देशात स्टार्ट अप मध्ये महाराष्ट्र एक क्रमांकावर. हे तुम्हाला बघवत नाही म्हणून खोटे आरोप करणे सुरु आहे.

महाराष्ट्राला बदनाम करतांना उद्वेग होतो. जे आरोप केले त्याचे पुढ काय झाले. सुशांतसिंगचे काय झाले.आम्ही कधी तुमच्या कुटुंबाची निंदानालस्ती केली नाही. एकतर्फी प्रेम करुन महाराष्ट्र विद्रुप करायचा यांचा प्रयत्न. या एकत्र बसून महाराष्ट्र पुढे नेऊया घेऊन या योजना. महाराष्ट्र हिंदुत्वाची तुम्ही काळजी करु नका

संजय दत्तला जसे सिनेमात गांधीजी दिसतात तशी एक केस आहे आपल्याकडे स्वतः ला बाळासाहेब समजायला लागतात. शाल घालतात. सिनेमात शेवटी संजय दत्तला कळत की डोक्यात केमिकल लोचा झालाय असे मुन्नाभाई फिरताहेत. आता आदित्य तिरुपतीला गेला होता आता अयोध्या. रामज्नमभूमीला मी जातांना शिवनेरीची पवित्र माती नेली. तेव्हा चमत्कार योगायोग म्हणा आपल्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो त्याचे भांडवल आम्ही केले नाही.

प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार हे सरकारचे काम देवेंद्र तुम्हाला फक्त झेंडा आणि भोंगा लावायचे. केंद्राचे खाते पुरातत्त्व म्हणत तुम्ही नाही करायचे मग पुरा या खात्यांना. हवे तर तुमची देखरेख ठेवा. आमच्या राज्यातली देवळ. औरंगजेबाचे थडगे सांभाळणारे हेच ते पुरातत्त्व विभाग केंद्राचे. रेल्वेची जमीन मिळवून द्या, अभिजात भाषेचा दर्जा मिळवून द्या. महाराज जन्माला आले नसते तर तुम्ही भोंग्यात असता.

जावेद मियाँदाद घरी आला बाळासाहेब स्पष्ट म्हणाले अतिरेकी कारवाया थांबत नाही तोवर पाकिस्तान सोबत क्रिकेट नाही. मियाँदाद म्हणाला सेट झालेल्या बॅटस्मनला आम्ही डिवचतो. बोबडे बोलचा किस्सा. असल्याला sledging म्हणतात. आपण जे काम करतो ते यांना बघवत नाही. पिकलेले आंबे पडले पण सरकार नाही. खोट्या मार्गाने मागे लागाल तर पळताभुई करुन सोडू. शिखंडी सारखे लढू नका तुम्हाला दया माया दाखवली जाणार नाही. जनता ठरवेल कुणी राजकारण करायचे. सुधरा आता. लंकेकडे बघा लोकांनी पेटवली. तुम्ही घर पेटवु नका त्याने चुल पेटत नाही. उज्वला योजनेत दिलेले अन्न शिजवायचे कसे?. माझे आजोबा रोज आमच्या कडून प्रार्थना म्हणून घ्यायचे.

महाराष्ट्र पेटत का नाही म्हणून हे सगळ चाललय. कोरोना काळात जनतेने सहकार्य केले त्यांचे आभार. अहवालानुसार २०१७-२०२२ २ कोटी जनतेचा रोजगार गेले आहेत याकडे लक्ष नाही. सगळ्या पक्षांना आवाहन राजकारण, हे पाप करु नका. मोठ्या संख्येने आलात हा हिंदू महासागर आहे. ही शक्ती अशीच पाठीशी असू द्या.