आमदार निवासातील खोलीचं छत कोसळलं; एकदम ok म्हणणारे आमदार पाटील थोडक्यात बचावले

काय झाडी, काय डोंगार, काय हाटील ओकेमधी हाय समंद या डायलॉगमुळे शहाजीबापू पाटील महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरले

shiv sena rebel shahajibapu patil briefly survived the roof of room in mumbai

काय झाडी, काय डोंगार, काय हाटील ओकेमधी हाय समंद असं म्हणणारे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील एका अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. मुंबईच्या आमदार निवासातील शहाजीबापू पाटील यांचे खोलीचे छप्पर अचानक खाली कोसळले. या अपघातावेळी शहाजीबापू खोलीतचं होते अशी माहिती समोर आली आहे. पण सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नसून ते सुखरुप आहेत.

दक्षिण मुंबईत मंत्रालयाजवळच्या आकाशवाणी समोरच्या आमदार निवासाशहाजीबापू पाटील यांची खोली आहे. बुधवारी ते आमदार निवासात येत खोलीजवळ विश्रांतीसाठी पोहचले. मात्र खोलीचा दरवाजा उघडताच छताचा मोठा भाग खाली कोसळला. सुदैवाने या घटनेतून ते थोडक्यात बचावले आहेत. त्यांच्या खोलीतील छताचा भाग कोसळ्याचे काही फोटो आता समोर येत आहे. फोटोमध्ये पाहू शकतो की, छताचा मोठा भाग आहे शहाजीबापू पाटील यांच्या बेडवरचं कोसळला आहे.

काय झाडी, काय डोंगार, काय हाटील ओकेमधी हाय समंद या डायलॉगमुळे शहाजीबापू पाटील महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरले. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरी करणाऱ्या आमदारांमध्ये शहाजीबापू पाटील देखील होते. त्यावेळी शहाजी पाटील या आमदारांसोबत गुवाहाटीमध्ये होते. अनेक दिवसांपासून शहाजी पाटील संपर्कात नसल्याने एका कार्यकर्त्याने त्यांना फोन केला. यावेळी कार्यकर्त्याने त्यांना तुम्ही कुठे आहेत अशी विचारणा केली. त्यावर शहाजीबापू पाटील यांनी काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, OKमधी हाय समंद अशा गावरान भाषेत गुवाहाटीमध्ये असल्याचे सांगितले. त्यांच्या संवादाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. यावरून सोशल मीडियावर तुफान मिम्स व्हायरल झाले. तर एक मराठी यूट्यूबर शंतनू पोळे चक्क याने चक्का त्यांच्या डायलॉगवर भन्नाट गाणं सुद्धा तयार केलं. हे गाणं आता सोशल मीडियावर तुफान गाजतयं. शहाजी पाटील हे सध्या सांगोला मतदारसंघाचे आमदार आहेत.


उपमुख्यमंत्र्यांनी हाताला धरून मुख्यमंत्र्यांना खुर्चीत बसवले, शिंदेंचा कारभार सुरू