मुख्यमंत्र्यांच्या सभेचा टीझर रिलीज, शिवसेना पक्षप्रमुख कोणाचा काढणार मास्क

Shiv Sena releases teaser of CM's meeting
Shiv Sena releases teaser of CM's meeting

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मी 14 तारखेला अनेकांचा मास्क काढणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी जाहीर केले आहे. त्यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यातच शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 14 मेच्या जाहीर सभेचा टीझर ट्वीट करण्यात आला आहे. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख कोणाचा मास्क काढणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

या टीझरमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचा अंश वापरण्यात आला आहे. मी शिवसेना प्रमुख जरुर आहे. पण तुमची ताकद माझ्यासोबत आहे, म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे भाषण टीझरमध्ये दाखवले आहे. याशीवाय साहेबांवर श्रद्धा असणाऱ्या, प्रत्येक शिवसैनिकाने खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला, यायलाच पाहिजे, असे आवाहन टीझरमधून करण्यात आले आहे.

 

दरम्यान 14 तारखेला माझी सभा आहे. माझ्या मनात आहे ते मी बोलणार आहे. माझे तुबलेले नाहीय पण मनात काही गोष्टी आहेत, त्या बोलणार आहे. 14 तारखेला अनेकांचे मास्क काढणार, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना थेट इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून माणसात आल्यासारख वाटत आहे. मी माईक समोर मास्क काढला आहे. तसा मास्क मी 14 तारखेला काढणार आहे, कारण हा महापालिकेचा कार्यक्रम आहे. मी पाणी गढूळ करु पाहत नाही. पाणी देण्याच्या कार्यक्रमात मला राजकारण आणायचे नाही, असेही शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते.