Thursday, February 25, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी 'आंदोलनजीवी' असा उल्लेख म्हणजे रस्त्यावर उतरणाऱ्यांची थट्टा- सामना

‘आंदोलनजीवी’ असा उल्लेख म्हणजे रस्त्यावर उतरणाऱ्यांची थट्टा- सामना

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतचं राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना देशात आंदोलनजीवी निर्माण झाल्याचं म्हटलं होत.
मोदींच्या या वक्तव्यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधील रोखठोक सदरात राऊत यांनी भाजपने आतापर्यंत केलेल्या आंदोलनाचा हवाला देत ज्या भाजप नेत्यांनी ही आंदोलने केली त्यांनाही आंदोलनजीवी ठरवल्याची टीका केली आहे.

मोदी यांनी शेतकरी आंदोलनावर बोलताना आंदोलनजीवी हा शब्द वापरला होता. त्यावरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. राऊत यांनी याच मुद्दयावरून भाजपने देशात आतापर्यंत केलेले अयोध्या आंदोलन ,श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केलेले आंदोलन, जयप्रकाश नारायण यांनी आणीबाणीविरोधात केलेले आंदोलन हे परजीवी होते काय?असा सवाल केला आहे. त्याचबरोबर गोध्राकांड हे आंदोलनच होते व त्यातूनच मोदी हिंदू समाजाचे नवे मसिहा बनले.पण हे आंदोलन परजीवी असल्याचे तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी म्हटले नाही. तसेच या आंदोलनामुळेच मोदी व शहा दिल्लीच्या तख्तापर्य़ंत पोहचल्याचेही राऊत यांनी सदरात म्हटले आहे.

- Advertisement -

त्याचबरोबर वीर सावरकर यांचे स्वातंत्र्याचे आंदोलन सशस्त्र होते त्याबद्दल इंग्रज सरकारने त्यांना ५० वर्षाच्या काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली. यामुळे निदान त्यांना तरी परजीवी किंवा आंदोलनजीवी म्हणू नका असा टोलाही राऊत यांनी मारला आहे.

- Advertisement -