घरताज्या घडामोडीSanjay Raut : ''...तुरुंगात जाण्यापेक्षा भाजप बरा''; संजय राऊतांची सडकून टीका

Sanjay Raut : ”…तुरुंगात जाण्यापेक्षा भाजप बरा”; संजय राऊतांची सडकून टीका

Subscribe

मुंबई : ज्यांच्यावर आधी भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांचाच पक्ष प्रवेश थाटात केला जातो आहे. भाजपच्या नेत्यांना विस्मरणाचा रोग झालेला दिसतो, अशा शब्दांत उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे. ‘भ्रष्टाचाराचा एकच नारा..तुरुंगापेक्षा भाजपा बरा’ अशा शब्दात त्यांनी भाजपवर तोफ डागली आहे. टी.व्ही. सेंटर येथे आयोजित जनसंवाद सभेत ते बोलत होते.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी सोमवार, १२ फेब्रुवारी रोजी आपल्या आमदारकीचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. लवकरच ते भाजपात प्रवेश करतील, असा अंदाज आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस सोडण्याच्या निर्णयावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. त्यावरच संजय राऊत आईनी प्रतिक्रिया दिली.

- Advertisement -

हेही वाचा – Modi Govt : वानखेडे आणि शिंदेंबाबत कायद्याचे दुहेरी मापदंड का? ठाकरे गटाचा थेट सवाल

भाजप आधी विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करते, आणि त्यानंतर त्याच नेत्यांना आपल्या पक्षात घेते, असे सांगत भाजप नेत्यांना आपल्याच बोलण्याचे विस्मरण झाले आहे की काय, असा टोला राऊत यांनी लगावला. भाजपामुळे आता ‘भ्रष्टाचाराचा एकच नारा..तुरूंगापेक्षा भाजपा बरा’ असा नवा नारा सुरू झाल्याचेही ते म्हणाले. नुकताच हा नारा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी देखील दिला आहे.

- Advertisement -

आदर्श घोटाळा, 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा अशा प्रकरणांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अशोक चव्हाण, अजित पवारांना तुरुंगात टाकायला निघाले होते. आता याच दोघांना सोबत घेऊन ते पुढे जात आहेत. यावेळी खासदार राऊत यांनी पंतप्रधान, फडणवीस यांनी केलेले भाषणच ऐकविले. राष्ट्रीय स्वयंसेवकांच्या शाखा आता काँग्रेस कार्यालयात भरणार का, असा सवालही त्यांनी केला.

हेही वाचा – Ashok Chavan : अशोक चव्हाण यांचा आजच भाजपा प्रवेश; चर्चेला उधाण

राज्यात दरोडेखोरांचे राज्य आहे

राज्यात दरोडेखोरांचे राज्य आले आहे, अशा भाषेत राऊत यांनी शिंदे सरकारवर टीका केली. छत्रपती संभाजीनगरची गद्दारी आमच्या जिव्हारी लागली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर या गद्दारांना धडा शिकविला जाईल, असेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -