मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानाची रेकी करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी साडे नऊ ते दहा वाजताच्या दरम्यान दोन बाईकस्वारांकडून राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानेचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यात आले. दहा कॅमेरे लावून संजय राऊत यांच्या मैत्री बंगल्याची रेकी करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास देखील सुरु केला आहे.
बाबा सिद्दीकींची हत्या मुंबईत; काही बरेवाईट झाले तर…
संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांच्याकडून सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे. सुनील राऊत यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानंतर राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, बाईकवरुन दोन जण आले. त्यांनी हेल्मेट घातलेले आहे. जॅकेट घातलेले आहे. चेहरा दिसणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली होती. आमच्या घराला दोन गेट आहेत. समोरील गेटची रेकी केल्यानंतर बाईकस्वारांनी मागील गेटचेही व्हिडिओ आणि फोटो घेतले. आम्ही सीसीटीव्हीमध्ये हे पाहिल्यानंतर सर्व फुटेज पोलिसांना दिला आहे.
सुनील राऊत यांनी रेकी प्रकरणी गंभीर भीती व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे
बाबा सिद्दीकी यांची मुंबईत निर्घृण हत्या झाली आहे. आम्ही सरकारला संरक्षण मागितले आहे. मात्र सरकार संरक्षण देत नाही. संजय राऊत यांच्या जीवाचे काही बरेवाईट झाले, तर यासाठी सरकार जबाबदार असेल, असं संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी म्हटले आहे. रेकी करणारी गाडी उत्तर प्रदेश किंवा बिहारमधील असण्याची शक्यता संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी व्यक्त केली. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये रेकीचे दृष्य कैद
खासदार संजय राऊत यांच्या भांडूप येथील ‘मैत्री’ या बंगल्याची दोन अज्ञात व्यक्तीकंडून रेकी करण्यात आली. संजय राऊत यांच्या घराच्या सीसीटीव्हीमधून हा प्रकार उघड झाला. दोन संशयित संजय राऊत यांच्या बंगल्याचे फोटो काढताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतात. त्यानंतर ते निघून जातात. हे दोन जण रेकी करत असताना संजय राऊत यांच्या घरी कोणीच नव्हते.
हेही वाचा : Devendra Fadnavis : माजुरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही; कल्याणप्रकरणी मुख्यमंत्र्यांचा इशारा
Edited by – Unmesh Khandale