Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई शिवाजी पार्क कात टाकणार !

शिवाजी पार्क कात टाकणार !

स्थायी समिती बैठकीत शिवाजी पार्कच्या विकासकामाला मंजुरी मिळाली असून यामुळे खेळाचे मैदान हे हिरवळीत परावर्तित होऊन नागरिकांना, खेळाडूंना होणारा धुळीचा त्रास दूर होण्यास मदत होणार आहे.

Related Story

- Advertisement -

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह शरद पवार व अन्य पक्षाच्या नेत्यांच्या राजकीय भाषणांनी गाजलेले व अनेक क्रिकेटपटू घडवलेले शिवाजी पार्क लवकरच कात टाकणार आहे. मुंबई महापालिका ४.७ कोटी रुपये खर्चून या शिवाजी पार्कचा कायापालट करणार आहे. त्यामुळे खेळाचे मैदान हे हिरवळीत परावर्तित होऊन नागरिकांना, खेळाडूंना होणारा धुळीचा त्रास दूर होण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणें या मैदानात पावसाळ्यात पाणी साचते. त्यामुळे त्याचा त्रास नागरिकांना व विविध खेळ खेळणाऱ्या खेळाडूंना होतो. त्यामुळे या मैदानाचा समतल राखला जाणार आहे. तब्बल २५ एकर जागेत विस्तारित असलेल्या या शिवाजी पार्क मैदानात मल्लखांब, फुटबॉल, क्रिकेट आदी विविध खेळांची प्रॅक्टिस केली जाते. क्रिकेटसाठी ७ पिच येथे उपलब्ध आहेत. त्यांचा दर्जा सुधारण्यात येणार आहे. मैदानात धुळीचे साम्राज्य असू नये व त्याचा नागरिकांना, खेळाडूंना त्रास होऊ नये, यासाठी हिरवळीवर जास्त भर देण्यात येणार आहे. तसेच, या मैदानावरील पाणपोईचेही नुतनीकरण करण्यात येणार आहे.

शिवाजी पार्क परिसरात दादर चौपाटी असून पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असतात. तसेच, नजीकच चैत्यभूमी आहे. याठिकाणी भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी ६ डिसेंबर व १४ एप्रिल रोजी मोठ्या लाखोंच्या संख्येने भीम सैनिक देशातून, राज्याच्या कानाकोपऱ्यामधून येतात. त्यांना क्षणभर विश्राती मिळावी म्हणून मुंबई महापालिकेतर्फे याच मैदानात विशेष सुविधा बहाल करण्यात येतात. तसेच, जुन्या महापौर बंगल्याच्या जागेत आता नव्यानेच हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. त्या नजीकच स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान असून याठिकाणीही अनेक सावरकरवादी भेट देत असतात. तसेच, संयुक्त महाराष्ट्र कला दालन आहे. त्यामुळे ह्या सर्व महत्वाच्या बाबी पाहता शिवाजी पार्क मैदानाचा विकास तातडीने होणे हे आवश्यक ठरले.


- Advertisement -

हे वाचा- मुंबईत कोरोनाचा कहर! लसीकरणाची वेळ वाढवण्याची, मनसेची मागणी

- Advertisement -