घरमुंबईशिवाजीपार्क मैदानाचा लवकरच कायापालट

शिवाजीपार्क मैदानाचा लवकरच कायापालट

Subscribe

धुळमुक्त मैदानात हिरवळ राखणाररेन वॉटर हार्वेस्टींगसाठी रहिवाशांचा हट्ट

शिवतिर्थ अर्थात शिवाजीपार्क मैदानाचा आता कायापालट होणार आहे. शिवाजीपार्क मैदानातील धुळीमुळे आसपासच्या इमारतीतील रहिवाशी त्रस्त असून त्यांना दिलासा देण्यासाठी मैदानाच्या परिसरात हिरवळ निर्माण करण्याचा प्रयत्न महापालिकेच्या माध्यमातून सुरु आहे. महापालिका जी/उत्तर विभागाच्या माध्यमातून मैदानाच्या भागात गवताळ परिसर निर्माण करून खेळाडुंसह स्थानिकांनाही दिलासा देण्यात येणार आहे.

शिवाजीपार्क मैदानातील धुळीमुळे स्थानिक नागरिक त्रस्त असून यावर उपाय म्हणून महापालिकेने यासंपूर्ण मैदानातील परिसरात गवत लावण्याचा निर्णय घेतला. मैदानाचा सर्व परिसर एकाच समांतर पातळीवर आणून त्यावर वानखेडे मैदान आणि अंधेरीतील शहाजी राजे भोसले संकुलाप्रमाणे हिरवळ निर्माण करण्याचा विचार आहे. हिरवळ कायम राखण्यासाठी दरदिवशी शिवाजीपार्कच्या मैदानावर अडीच लाख लिटर पाण्याचा शिडकावा होणे आवश्यक आहे. परंतु शिवाजीपार्क मध्ये शिवाजीपार्क जिमखाना व समर्थ व्यायामशाळा येथे केवळ दोनच विहिरी उपलब्ध आहे. त्यातून एक लाख लिटर एवढे पाणी उपलब्ध होवू शकते. त्यामुळे हिरवळ कायम राखण्यासाठी पाण्याची गरज लक्षात घेवून याठिकाणी मलजल प्रक्रीया केंद्र उभारुन त्यातील पाण्याद्वारे शिवाजीपार्कवर हिरवळ राखून धुळीच्या त्रासातून रहिवाशांची सुटका करण्याचा आराखडा महापालिकेने तयार केला आहे.

- Advertisement -

जी/उत्तर विभागाच्या सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्याद्वारे शिवाजीपार्कमधील नागरिकांशी चर्चा करून हा सुशोभिकरणाचा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केला.परंतु याला शिवाजीपार्कमधील रहिवाशांनी तीव्र विरोध केला आहे. पावसाचे पाणी जमिनीत जिरवून विद्यमान दोन विहिरींसह अतिरिक्त रिंगवेल खोदून त्याद्वारे पाण्याची भूर्गातील पातळी वाढवण्याची सूचना रहिवाशांनी केली आहे. परंतु शिवाजीपार्कमध्ये मलजल प्रक्रीया केंद्र उभारण्यास शिवाजीपार्ककरांनी तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे शिवाजीपार्क मैदानाचा कायापालट करताना आता केवळ धुळीच्या ठिकाणीच गवत लावून हिरवळ निर्माण करण्याचा विचार प्रशासन करत आहे.

शिवाजीपार्क धुळमुक्त करण्यासाठी हिरवळ राखण्याचा विचार असून त्यासाठी शिवाजीपार्कमधील रहिवाशांची मते जाणून घेतली जात आहे. परंतु त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग करत हिरवळ राखण्यास सहमती दर्शवली आहे. परंतु विहिरींच्या पाण्यावर ही हिरवळ राखणे शक्य नसल्याने मलजल प्रक्रीया केंद्र उभारुन त्यातील पाणी यासाठी वापरण्याचे नियोजन महापालिका करणार आहे. परंतु या मलजल प्रक्रीया केंद्राला शिवाजीपार्कमधील जनतेने विरोध दर्शवला आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जर्‍हाड यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर धुळीच्या ठिकाणी गवत लावणे किंवा कमीत कमी पाण्यामध्ये हिरवळ कशी राखली जाईल या पर्यायाचा विचार करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. त्यानुसार पर्याय तपासले जातील.
-किरण दिघावकर, सहायक आयुक्त, जी/उत्तर विभाग

- Advertisement -

शिवाजीपार्कसाठी रेन वॉटर हार्वेस्टींगच पुरक

रेन वॉटर हार्वेस्टींग हा पर्यावरण प्रकल्प असून मलजल प्रक्रीया केंद्र हा खर्चिक प्रकल्प आहे. त्यामुळे शिवाजीपार्कच्या जनतेने रेन वॉटर हार्वेस्टींग प्रकल्प राबवून त्यातील पाण्याच्या आधारे मैदानात हिरवळ राखली जावी,अशी सूचना आमची सुचना आहे.
-डॉ.सिमा खोत, सामाजिक कार्यकर्त्या व पर्यावरणप्रेमी

शिवाजीपार्क मैदानांचा वापर टक्केवारीमध्ये

•एकूण शिवाजीपार्क मैदानाचे क्षेत्रफळ : १ लाख चौरस मीटर
•पदपथाचे क्षेत्रफळ : १० टक्के
•स्पोर्टस क्लबचे क्षेत्रफळ : २० टक्के
•क्रिकेटच्या खेळपट्टी : २५ टक्के
•फुटबॉल खेळपट्टी : ५ टक्के
•जॉगिंग आणि सायकल ट्ॅक : ६ टक्के
•इतर नवीन खेळ : ३ टक्के
•उर्वरीत खेळाची मोकळी जागा : ३१ टक्के
•एकूण ८ क्रिकेटच्या खेळपट्टया : १५०० चौरस मीटर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -