घरमुंबईशिवभोजन थाळी आता पार्सल मिळणार!

शिवभोजन थाळी आता पार्सल मिळणार!

Subscribe

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून सार्वजनिक ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. त्यामुळे ही गर्दी रोखण्यासाठी राज्य सरकारने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून आता राज्यात शिवभोजन थाळी पार्सल देण्यात येणार आहे. शिवभोजन थाळी केंद्रावर गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.‘ब्रेक दि चेनच्या‘ अंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात जनतेला उपलब्ध करून देण्याचे आदेश मंगळवारी दिले.

कोरोना काळात मजूर, कामगार, शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेला शिवभोजन थाळी मोठा आधार देत आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे सर्व हॉटेल, रेस्टॅारंट यांना पार्सल सुविधाच देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता शिवभोजन केंद्रावर देखील शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात उपलब्ध होणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली. कोरोनाच्या या दुसर्‍या लाटेला थांबविण्यासाठी सरकारने ‘ब्रेक दि चेन’ या मोहिमेच्या अंतर्गत काही कडक निर्बंध लागू केले आहेत. या नियमांचे सर्वांनी पालन केले तरच आपण कोरोनाला रोखू शकतो. त्यामुळे सर्वांनी राज्य सरकारला सहकार्य करावे, असे आवाहनही भुजबळ यांनी केले.

- Advertisement -

 किंमत तीच, बदल नाही
सरकारने लागू केलेल्या सर्व नियमांचे पालन जनतेने करावे आणि प्रशासनाला मदत करावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या पार्सल सुविधेच्या निर्णयामुळे शिवभोजन थाळीच्या किमतीमध्ये कोणताही बदल आपण केला नाही. त्याचबरोबर पूर्वीप्रमाणेच ५ रुपयात शिवभोजन थाळी सर्वसामान्य जनतेला उपलब्ध होणार आहे, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -