घरमुंबईशिवडी-न्हावा शेवा पुल महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरेल; मुख्यमंत्र्यांना विश्वास

शिवडी-न्हावा शेवा पुल महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरेल; मुख्यमंत्र्यांना विश्वास

Subscribe

मुंबई : शिवडी-न्हावा शेवा पुलामुळे मुंबई, नवी मुंबई आणि एक तिसरी मुंबई या सी ब्रीजमुळे प्रकल्पामुळे जोडली गेली आहे. त्यामुळे या विकास असल्यामुळे हा राज्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरेल असा विश्वास मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत एकनाथ शिंदे यांनी शिवडी-न्हावा शेवा पुलाचा आज (24 मे) पाहणी दौरा केला. यावेळी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवडी-न्हावा शेवा पुल हा खऱ्या अर्थाने आर्थिक आणि भौतिक प्रगतीचा महामार्ग आहे. अशा या महत्त्वांकांशी प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते भूमिपूजन झाले होते, त्यामुळे याचे लोकार्पण मोदींनी करावे अशी विनंती आम्ही त्यांना करणार आहोत. एकंदरीत साऊथ मुंबई म्हणजे शिवडीवरून आम्ही हा पूल वरळीला जोडत आहोत आणि वरळीवरून कोस्टल जोडत आहोत. त्यामुळे नरिमंट पॉइंट किंवा कोस्टलवरून प्रवास करणारा माणूस थेट रायगडमध्ये उतरले. रायगडमधील चिरले गावात हा रस्ता जोडला जाणार आहे. तेथून हा रस्ता मुंबई-पुणे, मुंबई-गोवा एक्सप्रेस हायवेला जोडला जाईल, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

- Advertisement -

राज्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरेल
एकनाथ शिंदे म्हणाले की, ज्या ठिकाणी हा प्रकल्प होतो आहे, त्याठिकाणी मुंबई, नवी मुंबई आणि एक तिसरी मुंबई या सी पूल प्रकल्पामुळे जोडली जाईल आणि मोठ्या प्रमाणावर त्याठिकाणी विकास होणार आहे. याठिकाणी आयटी पार्क, फार्मा कंपन्या, मोठी गृहसंकुल होतील. या प्रकल्पासाठी वन ट्रिलियन डॉलर्स खर्च करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरेल. चारही जिल्ह्यांना जोडणारा, सर्वसामान्य लोकांचा वेळ वाचवणारा, इंधन वाचवणार, प्रदूषण कमी करणारा असा हा प्रकल्प आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

थांबलेल्या सर्व प्रकल्पांना चालना देण्याचं काम आमच्या सरकारने केलं
एकनाथ शिंदे म्हणाले की, समृद्धी प्रकल्पात अनेक स्पीडब्रेकर होते. आमचे सरकार आल्यानंतर ते स्पीडब्रेकर हटवले. शेवटी लोक कल्याणासाठी हे प्रकल्प आहेत, त्यामुळे वैयक्तिक सर्व बाजूला ठेवून काम करायचं असतं. मेट्रोचे सर्व प्रकल्प, समृद्धी महामार्ग किंवा हा प्रकल्प थांबला होता, परंतु आमचं सरकार 10 महिन्यांपूर्वी आल्यानंतर या सर्व प्रकल्पांना मोठ्या प्रमाणावर चालना देण्याचं सरकारने केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -