घरमुंबईजिओ फायबर विरोधात शिवसेना केबल चालकांच्या बाजूने

जिओ फायबर विरोधात शिवसेना केबल चालकांच्या बाजूने

Subscribe

तुम्हाला न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी केबल चालकांना दिले आहे. जिओ फायबरविरोधात सध्या केबल चालक आक्रमक झाले आहेत.

प्रत्येक गोष्ट लढा देऊन मिळवली आहे. तुम्हाला न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही. अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केबल चालकांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. जिओ फायबर विरोधात केबल चालकांनी रंगशारदा येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी बोलत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केबल चालकांना शिवसेना तुमच्यासोबत असल्याचा विश्वास दिला. तसेच जर इंटरनेट फुकट देता, मग रेशन देखील फुकटच द्या असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी हाणला. तर, सगळं डिजीटल करून पोटं भरणार नाहीत अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी सरकारला चिमटा काढला. सध्या जिओ फायबरविरोधात केबल चालक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडे धाव घेत पाठिंब्याची मागणी केली आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे

डिजीटल इंडियामध्ये केबल फुकट मिळते. मग पेट्रोल, डिझेल, दूध आणि भाज्या सगळेच फुकट द्या. तर, घरात रोजीरोटी नाही मग डिजीटल इंडियाने काय होणार? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला. रंगशारदामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येनं केबल व्यावसायिक हजर होते. तुम्ही घाबरू नका, शिवसेना तुमच्यासोबत आहे. असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी केबल व्यावसायिकांना दिले. ३० वर्षे राबून तुम्ही हा व्यवसाय उभा केलात. तुमचा हा व्यवसाय मी जाऊ देणार नाही. मागच्या वेळी सेटअप बॉक्स आला तेव्हा भाजपा सरकार सत्तेत होते. आता देखील भाजप सरकार आहे. केबल चालकांच्या पाठिशी शिवसेना खंबीरपणे उभी आहे. आम्ही तुमच्या व्यवसायाला कोणताही धक्का लागू देणार नाही. अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी केबल चालकांना बळ दिले. जिओ काही महिने फुकट सेवा देणार आहे. त्याचा परिणाम हा केबल व्यवसायावर होणार हे नक्की. सर्व फुकटात देणे म्हणजे आमिष दाखवण्यासारखे झाले. मात्र, या लढाईमध्ये शिवसेना केबल चालकांच्या पाठिशी आहे. माझ्या लोकांना उद्धवस्त करून मार्केटमद्ये उतरू नका. आम्ही म्हणतो की आमच्याच लोकांशी करार करा. लढा द्यायची आमची तयारी आहे. भूमिपुत्रासांठी शिवसेना आहे. अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी केबल चालकांना आपला पाठिंबा दर्शवला आहे.

- Advertisement -

वाचा –उद्धव ठाकरेंची चलो वाराणसी,चलो अयोध्याची घोषणा!!

जिओ फायबर विरूद्ध केबल चालक

जिओ फायबर सुरू झाल्यानंतर केबल व्यवसायावर गदा येईल. लाखो जण बेरोजगार होतील असे केबल चालकांचं म्हणणं आहे. त्यामुळे आमच्या पोटावर उटणारे जिओ फायबर आम्हाला नको. त्याला आम्ही विरोध करत आहोत. अशी भूमिका केबल चालकांनी घेतली आहे. दरम्यान, जिओ फायबरविरोधात राजकीय पाठिंबा मिळवण्यासाठी देखील केबल चालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत आपले म्हणणे मांडले होते. त्यावेळी  उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी देखील केबल चालकांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर आज ( शनिवारी ) उद्धव ठाकरे यांनी केबल चालकांच्या कार्यक्रमाला हजेरी लावत त्यांना घाबरण्याचे कारण नाही असे आश्वासन दिले.

- Advertisement -
वाचा – शिवसेना फोन टॅपिंग प्रकरण: ‘माय महानगर’चा दणका!

वाचा – गणेशोत्सवाच्या वादात शिवसेना आणि मनसेची उडी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -