घरमुंबई'या' ऐतिहासिक निर्णयाच्या जल्लोषातही सेना भाजपात चढाओढ

‘या’ ऐतिहासिक निर्णयाच्या जल्लोषातही सेना भाजपात चढाओढ

Subscribe

जम्मू काश्मीर मधील कलम ३७० हटवून विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे देशभरात स्वागत होत आहे.

जम्मू काश्मीर मधील कलम ३७० हटवून विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे देशभरात स्वागत होत आहे. मात्र या ऐतिहासिक निर्णयाचा जल्लोष करण्यासही ठाण्यात शिवसेना भाजपमध्ये चढाओढ रंगल्याची दिसून आली.ठाणे महापालिकेबाहेरच शिवसेनेचे नेते आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांनी ढोल ताशांच्या गजरात फटाके वाजवून जल्लोष केला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न अखेर पूर्ण

”जम्मू काश्मीर मधील ३७० कलम रद्द करावे व इतर राज्याप्रमाणे त्यांचाही कारभार चालला पाहिजे असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. या निर्णयामुळे तमाम भारतीयांची अपेक्षा पूर्ण झाली आहे,” असे पालकमंत्री शिंदे म्हणाले. तसेच याबद्दल एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन केले.

- Advertisement -

हेही वाचा – ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांना अखेर अटक

जम्मू काश्मीरसाठी श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी बलिदान दिले

तर दुसरीकडे भाजपच्या कार्यालयाबाहेर ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले यांच्या उपस्थितीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी मोदी मोदींच्या जोरदार घोषणा दिला. ”जनसंघ ते भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांची ही मागणी होती. जम्मू काश्मीरसाठी जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी बलिदान दिले. ‘व्यर्थ न हो बलिदान’ अशीच भावना भाजपच्या कार्यकर्त्यांची व तमाम भारतीयांची होती. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा या भारतमातेच्या पुत्रांनी हा निर्णय घेतला. दिलेला शब्द त्यांनी पूर्ण केला त्यामुळे त्यांचे शतशः आभार” असे लेले यावेळी म्हणाले. तसेच डोंबिवली शिवसेना शहर शाखेच्या वतीनेही कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या नेतृत्वाखाली ढोल ताशांच्या गजरात तर कल्याणात शिवाजी चौकात आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी पेढे वाटून जल्लोष केला. या जल्लोषासाठी सेना भाजपात चढाओढ दिसून आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -