घरमुंबईयुतीने मतदारांची फसवणूक केली; ठाण्यातील महिलेची हायकोर्टात याचिका

युतीने मतदारांची फसवणूक केली; ठाण्यातील महिलेची हायकोर्टात याचिका

Subscribe

मतदारांची फसवणूक केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी याचिकेद्वारे मागणी

राज्यात विधानसभा निवडणूक होऊन आणि निकाल लागून एक महिना पूर्ण झाला. मात्र महाराष्ट्रात अद्याप सत्ता स्थापन झालेली नाही. युतीच्या उमेदवाराला मतदान केले. मात्र युतीच फुटली. राज्यात लवकर सत्ता स्थापन होईल म्हणून युतीला केलेले मतदान फुकट गेले. मतदारांची फसवणूक केली. याचा जाब विचारण्यासाठी कळवा परिसरातील एका महिलेने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. ही याचिका दाखल करून फसवणूक करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आलेली आहे.

हेही वाचा – गृहिणीकडून टिकटॉक बंदीसाठी हायकोर्टात याचिका दाखल

निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात युतीची सत्ता प्रस्थापित होईल, याच मानसिकतेतून मतदार राज्याने युतीतील शिवसेनेचे उमेदवार यांना मतदान केले. निवडणुकीच्या निकालानंतर मात्र युती फुटली. शिवनेसोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेस सत्तेत सहभागी होत असल्याने ज्या मतदारांनी युतीला मतदान केले, त्या मतदारांची फसवणूक झाली आहे. मतदाराचा अपमान केला आहे. त्यामुळे मतदारांची फसवणूक केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, अशा आशयाची याचिका मुंबई हायकोर्टात याचिकाकर्त्या प्रिया चौहान -कुलकर्णी यांनी केलीआहे.


हेही वाचा – सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला; उद्या होणार सुनावणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -